Tuesday, 21 July 2020

Zee Yuva - Almost Suphal Sampurn

मेकअप सुफळ संपूर्ण

सर्व नियम आणि अटींचं पालन करून जवळपास  महिन्यांच्या मोठ्या ब्रेक नंतर मालिकांच्या सेटवर शूटिंगची लगबग सुरु झाली आणि बघता बघता सर्व मालिकांचे नवीन भाग प्रेक्षकांच्या भेटीस आलेझी युवा वरील लोकप्रिय मालिका ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेचे नवीन भाग १३ जुलै पासून वाहिनी सादर करतेयया मालिकेचे कलाकार आणि संपूर्ण टीम सेटवर पूर्ण खबरदारी घेऊन नियमांच्या चौकटीत राहून चित्रीकरण करत आहेततसेच कमी लोकांसोबत योग्य ती सावधानता बाळगत मालिकेचं शूटिंग होतंयपरंतु अनलॉकनंतर शूटिंग करताना या सेटवर कलाकारांना सर्वात मोठा बदल स्वीकारावा लागला तो म्हणजे मेकअप आर्टिस्ट्सची अनुपस्थितीहो हे खरंयऑलमोस्ट सुफळ संपूर्णच्या सेटवर सर्व कलाकार स्वतःचा मेकअप स्वतः करत आहेतहे खरतर कलाकारांसाठी एक आव्हानच म्हणावं लागेलपण स्वतःचा मेकअप स्वतः करताना सेटवरील सर्व कलाकारांची काय तारांबळ उडते हे सांगताना अभिनेत्री गौरी कुलकर्णी म्हणाली, " महिन्यांनंतर ऑलमोस्ट सुफळ संपूर्णच शूट सुरु झालंय आणि हे शूटिंग करताना आम्ही खूप काळजी घेतोयसेटवर सगळ्याच गोष्टींची काळजी घेतोय आणि त्यामुळे सध्या आम्ही स्वतःचा मेकअप आणि हेअर स्वतः करतोयआम्हाला सांगण्यात आलं होतं कि सगळ्यांना स्वतःचा मेकअप स्वतः करावा लागेलरेग्युलर मेकअप आणि स्क्रिनवरती दिसण्यासाठी करण्यात येणारा मेकअप यात खूप फरक असतोत्यामुळे आम्हाला हा मेकअप  करण्याचा फारसा अनुभव नव्हताशूटिंगचे पहिले दोन दिवस मेकअप आणि हेअर आर्टिस्ट्सनी येऊन आम्हाला गाईड केलंत्यांनी आम्हाला आमच्या स्किनटोन नुसार कुठले मेकअपचे शेड्स वापरायचे ते सांगितलेप्रत्येकाला वेगवेगळे स्पॉंजपफ्स दिलेमी माझ्या घरून माझं बहुतेक मेकअपच सामान आणलं आहेत्यामुळे मी माझा मेकअप करताना माझंच सामान वापरतेयहा एक खूप छान आणि वेगळा अनुभव आहेसुरुवातीला खूप अवघड गेलं करणं सवय नव्हतीमला मेकअप मधलं काहीच येत नव्हतंपण आता मला हळूहळू बऱ्यापैकी मेकअप जमतेय असं मी म्हणू शकतेमी माझा मेकअप केल्यावर मला बाकीचे सहकलाकार त्यावर प्रतिक्रिया पण देतातकधी काही कमी जास्त झालं तर सांगतात."
मेकअप स्वतःच करण्याचं आव्हान कलाकारांनी लीलया पेलल्यामुळे त्यांची मेकअप करण्याची कला देखील सुफळ संपूर्ण झाली आहे असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही.

No comments:

Post a Comment