Thursday, 9 July 2020

Zee Yuva - Dr. Don


'डार्लिंग डीनसेटवर अशाप्रकारे घेतेय काळजी!!!
'झी युवावाहिनीवरील आपल्या सगळ्यांच्या आवडत्या 'डॉक्टर डॉनया मालिकेच्या सेटवर आता लगबग दिसू लागली आहेमालिकेचे चित्रीकरण पुन्हा सुरु झाले आहेकोरोनाच्या संकटाचा विचार करतायोग्य ती सर्व खबरदारी घेऊन चित्रीकरण केले जात आहेसेटवर नेमके वातावरण कसे आहेआणि आपली लाडकी अभिनेत्री श्वेता शिंदे कशाप्रकारे काळजी घेत आहेयाविषयी तिच्याशी केलेली ही बातचीत;
. 'डॉक्टर डॉन'च्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहेचित्रीकरणादरम्यान सेटवर काय काय खबरदारी घेतली जात आहे?
मीरारोडही अत्यंत गजबजलेली जागा आहेया 'रेड झोन'मध्ये चित्रीकरण  करण्याचा निर्णय घेण्यात आलासध्या मालिकेचे चित्रीकरण एका रिसॉर्टमध्ये सुरु आहेमालिकेतील कलाकार  संपूर्ण टीम तिथेच राहतेकुणालाही बाहेरून आत येण्याचीअथवा बाहेर कुठेही जाण्याची परवानगी देण्यात येत नाहीजेवणाखाण्याच्या कारणाने सुद्धा कुणीही आवाराच्या बाहेर पडत नाहीसंपूर्ण सेटप्रत्येक कलाकारांची खोली या सगळ्याचं निर्जंतुकीकरण करण्यात येतंमास्कसॅनिटाजयझर्सफेसशिल्ड या सगळ्याचा वापर करूनच चित्रीकरण केलं जातंकलाकारांना सीनच्या दरम्यान या गोष्टी वापरणे अशक्य असतेत्यामुळे आम्ही कलाकार मंडळी अधिक खबरदारी घेत आहोतएखाद्या सीनची तालीम करायची झालीतरीही सामाजिक अंतर राखले जातेआपल्यामुळे कुणालाही त्रास होऊ नयेयाचा विचार करूनसेटवरील प्रत्येक व्यक्ती जबाबदारीने वागत आहे.
सेटवर नेमकं कसं वातावरण पाहायला मिळत आहे?
दिग्दर्शकमुख्य कलाकार या मंडळींनी पुढाकार घेऊन सेटवरील वातावरण सकारात्मक आणि उत्तम राहील याची काळजी घेणे आवश्यक असतेआमचा नेहमी हाच प्रयत्न असतो.  आमच्यापैकी कुणालाही काहीही झालेले नाही आणि सगळेजण आपापली जबाबदारी ओळखूनउत्तमरीत्या काम करू याची जाणीव आमच्या वागण्याबोलण्यातून सर्वांना होईल याची संपूर्ण खबरदारी घेतली जातेत्यामुळे सकारात्मक वातावरणात चित्रीकरण पार पडेल याची आम्ही काळजी घेत आहोत.
सेटवर तू स्वतःची काळजी कशी घेत आहेस?
मी सातत्याने थर्मास सोबत ठेवतेगरम पाणी पीत राहणंवेळोवेळी सी व्हिटॅमिनच्या गोळ्या घेणंसुरु आहेरोगप्रतिकार शक्ती वाढेल यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी मी करते आहेचांगल्या आरोग्यासाठी उत्तम आहारनियमित व्यायाम या गोष्टी सुरु आहेतआरोग्य उत्तम राहावं आणि कुठलाही आजार होऊ नयेयासाठी जी काही खबरदारी घेणं शक्य आहेती सर्व खबरदारी मी घेते आहेसगळेच कलाकार योग्यप्रकारेआपल्या आरोग्याची काळजी घेत आहेत.
तू स्वतःची काळजी कशाप्रकारे घेत आहेस?
माझा मेकअप मी स्वतःचा स्वतः करते आहेमाझी केशभूषा होण्याआधी त्यासाठी लागणार असलेली सर्व उपकरणं व्यवस्थित निर्जंतुक करण्यात येतातमालिकेतील पोषाखासाठी वापरण्यात येणारे कपडे सुद्धा योग्यरीतीने निर्जंतुक करून मगच मी वापरतेया सर्व छोट्या गोष्टींची सवय नसल्यामुळेसुरुवातीच्या काळात सगळंच थोडं कठीण वाटत आहेमात्र यासगळ्याची सवय आम्ही हळूहळू करून घेत आहोत.

No comments:

Post a Comment