Monday 13 July 2020

Zee Yuva - Dr. Don


डॉक्टर डॉनची कोविड योद्धयांना मदत!!!
/
म्हणून डॉक्टर डॉन मालिकेचं चित्रीकरण होतंय नवीन ठिकाणी
देवदत्त नागेश्वेता शिंदे आणि रोहिणी हट्टंगडी अशा दिग्गज कलाकारांचे, 'झी युवावाहिनीवरील 'डॉक्टर डॉनया मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन झालेअल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडलीडॉक्टर डॉनने निराळा धुमाकूळ घालतआपले सगळ्यांचे भरभरून मनोरंजन करण्यास सुरुवात केलीमालिकेचा वेगळा विषयडॉक्टर डॉन आणि त्याच्या पंटर मंडळींचा जलवा यासगळ्या गोष्टी प्रेक्षकांच्या लाडक्या ठरल्याडार्लिंग डीनवर मनापासून प्रेम करणारा डॉक्टर डॉनहास्याचे अनेक डोज आपल्यासाठी घेऊन येऊ लागलाही मालिका पाहताना हसूनहसून पुरेवाट होतेभन्नाट संकल्पना असलेली डॉक्टर डॉन ही मालिकानेहमीच भरपूर आनंद देणारी ठरली आहे
लॉकडाऊनमुळे सर्वच मालिकांचे चित्रीकरण थांबले आणि डॉक्टर डॉन सुद्धा पडद्यावरून नाहीसा झालानियमांमध्ये थोडी शिथिलता आणल्यामुळेपुन्हा एकदा चित्रिकरण सुरु झाले आहे१३ जुलै पासून या मालिकेचे नवीन भाग देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेतअसे असताना, 'झी युवा'वरील 'डॉक्टर डॉनएका आगळ्यावेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहेपडद्यावरील डॉक्टर डॉन आता खऱ्या आयुष्यात कोविड योद्ध्यांच्या मदतीसाठी सज्ज झाला आहे.
डॉक्टर डॉन या मालिकेच्या चित्रीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या सेटमध्येहॉस्पिटलच्या सेटचा समावेश आहेमालिकेत पाहायला मिळत असलेलं हे हॉस्पिटलयापुढे कोविड सेंटर म्हणून वापरले जाणार आहेलॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता आणल्यानंतरकोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहेयावरील उपाय म्हणून अनेक कोविड सेंटर्सची निर्मिती केली जात आहेमीरा-भाईंदर परिसरात 'डॉक्टर डॉनया मालिकेतील हॉस्पिटलचे चित्रीकरण करण्यात येतेया महापालिकेलाकोविड सेंटरसाठी जागेची आवश्यकता होतीहॉस्पिटलचा सेट उभारलेला असल्याने, 'डॉक्टर डॉनया मालिकेच्या टीमकडे जागेविषयी मागणी करण्यात आलीसंपूर्ण देश कोविड-१९च्या महामारीशी लढत असतानामालिकेच्या टीमने सुद्धा कोविड योद्ध्यांना मदत करण्याची ही संधी सोडली नाहीकोरोनाविरुद्धच्या लढाईत आपलाही खारीचा वाटा असावायासाठी मालिकेचा सेटमहापालिकेच्या ताब्यात देण्यात आला आहेमालिकेत गोंधळधमाल आणि मजामस्तीचा केंद्रबिंदू ठरणारा हा सेटयापुढे कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणार आहेचित्रीकरणासाठी नवा पर्याय शोधणेही छोटीशी समस्या समोर उभी थकलेली असलीतरीही मालिकेच्या सेटचा वापर एका अत्यंत महत्त्वपूर्ण कामासाठी होणार असल्यानेटीममधील प्रत्येकच कलाकार खूप खुश आहेनेहमी त्याच्या धुंदीत असणाराराडे करणारा डॉक्टर डॉनआता थेट कोविड योद्धयांच्या मदतीला धावून आलेला आहेसध्या या मालिकेचं चित्रीकरण कर्जत येथे एका रिसॉर्ट मध्ये होतंय.

No comments:

Post a Comment