Monday 13 July 2020

Zee Yuva - Lav Re Toh Video

या आठवड्यात भाऊ कदम म्हणणार ‘लाव रे तो व्हिडीओ’
आपल्या सगळ्यांचे लाडके सूत्रसंचालक डॉनिलेश साबळेहे आता 'झी युवावाहिनीवर सुद्धा दिसत आहेत. 'लाव रे तो व्हिडीओहा एक आगळावेगळाजबरदस्त कार्यक्रम ते घेऊन आलेप्रेक्षकच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असलेला हा कार्यक्रम सर्वांनाच खूप आवडतोयहा कार्यक्रम वेगवेगळ्या रंजक व्हिडीओजच्या माध्यमातून आपले सगळ्यांचे भरपूर मनोरंजन करतोयतसंच निलेश साबळे यांचा VJ म्हणजेच विकास जायफळे हा नवा अवतार सगळ्यांच्या पसंतीस उतरला आहेया कार्यक्रमात निलेश साबळे यांच्यासोबत एक सेलिब्रिटी गेस्ट देखील असतो जो या व्हिडीओजमधून सर्वात उत्तम व्हिडीओ सादर करणाऱ्या परफॉर्मरची निवड करतो.
या आठवड्यात महाराष्ट्राचा लाडका विनोदवीर भाऊ कदम या कार्यक्रमात उपस्थिती लावणार आहेआता या विनोदवीराला इंप्रेस करण्यासाठी परफॉर्मर्सना देखील तितकेच तोड व्हिडीओज सादर करावे लागतीलया आठवड्यात डुप्लिकेट्स गाजवणार लाव रे तो व्हिडिओचा मंचमहाराष्ट्राचा विनोदाचा बादशाह लक्ष्मीकांत बेर्डे तसंच उत्तर कोरियाचा नेता किम जोंग उन यांचे डुप्लिकेट्स व्हिडिओद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करतीलइतकंच नव्हे तर भाऊ कदम देखील प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेतत्यामुळे पाहायला विसरू नका 'लाव रे तो व्हिडिओ'

No comments:

Post a Comment