Monday, 19 October 2020

 


चाहत्यांच्या मागणीनुसार पुनरागमन!
आणखी एका प्रेमाने भरलेल्या सीझनसह ‘प्यार तुने क्या किया’ पुन्हा एकदा ‘झिंग’वर
६ वर्षात यशस्वी १० सीझन्सनंतर ‘प्यार तुने क्या किया’ सीझन ११ सह पुन्हा एकदा सुरू होण्यासाठी सज्ज असून यात नव्या युगातील प्रेम दाखवण्यात येईल. याआधी देखील या कार्यक्रमाने प्रेक्षकांना आपल्याशा वाटतील आणि ते  ज्यांचा उत्तमप्रकारे स्वीकार करतील अशा प्रेमकथा दर्शवल्या आहेत. निश्चितपणे हा कार्यक्रम तरुण पिढीचा आवडता आहे यात शंकाच नाही.
प्रेक्षकांच्या आयुष्यातील प्रेमानुभवातून प्रेरणा घेऊन भावनिक प्रेमकथा सादर करत प्यार तुने क्या किया या कार्यक्रमाने गेल्या १० सीझन्समध्ये प्रेक्षकांसोबत एक घट्ट नातं निर्माण केलं आहे. गेल्या काही सीझन्समध्ये पहिलं प्रेम, प्रेमाचा अर्थ, प्रेमात पडण्याचा अनुभव अशा वेगवेगळ्या थीम होत्या, या आगामी सिझनची थीम आहे प्रेमातील गोंधळ. प्रेम म्हंटल की प्रेमात गोंधळ सुद्धा उडतो. ही संकल्पना प्रत्येक तरुणतरुणी रिलेट करू शकतील अशी असून ही पिढी प्रेमामधील संभ्रमाला कशाप्रकारे हाताळत आहे आणि यातून वाट काढण्यासाठी काय काय मार्ग अवलंबत आहे हे कार्यक्रमात दाखवण्यात येईल. या नव्या सीझनमध्ये प्रेम हा एक सोपा पण जटिल वळण असलेला शब्द समजून घेण्यासाठी ही युवा पिढी कुठल्या विभिन्न परिस्थिती आणि संभ्रमातून जाते ते दिसून येईल. या सीझनच्या प्रोमोमधून आजच्या ह्या तरूण पिढीसाठी प्रेम म्हणजे काय हे दाखवण्यात आले आहे. ‘डिअर लव्ह’ असे अगदी समर्पक शीर्षक असलेल्या या प्रोमोमधून युवा पिढीच्या भावनांचे चित्रण करण्यात येते जिथे ते प्रेमाला ‘ओपन लेटर’ लिहित असून आपल्या मनातील प्रश्नही त्यात मांडतात.
या नव्या सीझनची प्रतीक्षा चाहते मोठ्‌या उत्साहाने करत असून झिंग या वाहिनीला या मालिकेच्या चाहत्यांनी प्यार तुने क्या किया हा कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याची विनंती केली. त्यांचे हे प्रेम त्यांनी मेसेजेस आणि कॉमेंट्‌स मधून व्यक्त केले आणि त्याच्या या विनंतीपुढे निर्मात्यांचे काहीच चालले नाही आणि त्यांनी झिंगच्या सोशल मीडिया हॅन्डल्सवर डिजिटल व्हिडीओ रीलीज करून प्यार तुने क्या किया या कार्यक्रमाच्या पुनरागमनाची घोषणा केली. हा व्हिडीओ रीलीज झाल्यानंतर काहीच वेळात झिंगने ह्या नव्या सीझनच्या प्रोमोचा लाँच करून प्रेक्षकांची इच्छा पूर्ण केली
‘प्यार तुने क्या किया’च्या नवीन सीझन सुरू होत आहे २४ ऑक्टोबर, शनिवार, संध्याकाळी ७ वाजता फक्त ‘झिंग’वर

No comments:

Post a Comment