पदेशातून मुंबईमध्ये आलेला नचिकेत आणि मुंबईतल्या एका मध्यमवर्गीय घरामध्ये वाढलेली संस्कारी सई यांची साधी सरळ प्रेमकथा म्हणजे झी युवा वाहिनीवरची ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण ही मालिका. परस्पर विरुद्ध दोन टोकांच्या वातावरणामध्ये वाढलेल्या या दोघांमध्ये तयार होणारी मैत्री, आकर्षण आणि त्यानंतरचं त्यांचं प्रेम या अनुशंघाने मालिकेची कथा उलगडताना दिसते. या मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवाती पासूनच पसंती दर्शवली आणि पाहता पाहता या मालिकेने ३०० भागांचा यशस्वी टप्पा पार केला.
सध्या या मालिकेत नवरात्रीची धूम पाहायला मिळतेय. हा सण साजरा करण्यासाठी नचिकेत त्याच्या अंगणात दांडियाचं आयोजन करण्याचं ठरवलं आहे. पण हे पाहून अप्पा मात्र चिडतात आणि याच कारणावरून कॅडी आणि अप्पा यांच्यामध्ये वाद सुद्धा होतो. त्यामुळे आता नचिकेतने नवरात्र साजरी करायला दांडिया खेळण्यासाठी घातलेला घाट यशस्वी होईल का? अप्पा त्याला दांडिया खेळायला परवानगी देतील का? अप्पांच्या रागावर सईची काय प्रतिक्रिया असेल?
हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.
हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.
No comments:
Post a Comment