झी युवावरची डॉक्टर डॉन ही मालिका आणि तिची वाढत जाणारी प्रेक्षक पाहिली तर सध्या देवा आणि डॉ मोनिका यांचा लव्ह ट्रॅक चांगलाच पसंत केला जातोय. आता प्रेम म्हंटलं की ते सहज सोप्प थोडीच असणार त्यातही उतार चढाव आले, रुसवे फुगवे आले जवळच्या लोकांच्या नाराजी किंवा त्यांचे हेवेदावेही आलेच. अशा या सगळ्या अडथळ्यांच्या शर्यतीतून पुढे जात रहतं ते खरं प्रेम. डॉक्टर डॉन मध्ये सध्या याच प्रेमाची परिक्षा पाहिली जातेय. देवा डॉ मोनिकाला लग्नाची मागणी घालण्याच्या तयारीमध्ये असतानाच त्याच्याच घरची माणसं त्याची ही परिक्षा घेऊ पहातायत.
एकीकडे देवाच्या आक्केचा डॉ मोनिकाला साफ विरोध आहे तर दुसरीकडे देवाची मुलगी राधा त्याच्या या प्रेमात आडकाठी घालू पहातेय. तिने तर देवाला सक्त ताकीद दिलीये की एक महिन्याच्या आत त्याने डॉ मोनिकासमोर त्याचं खरं रुप दाखवावं नाहीतर ती स्वतः तिच्या मोनिका मॅमना आपल्या वडिलांचं म्हणजे देवाचं सत्य सांगेल. देवा या सगळ्यामुळे चांगलाच कात्रीत सापडलाय. यासगळ्यामध्ये डॉ मोनिका त्याच्यासोबत खंबीरपणे उभी आहे. इतकंच नाही तर तिने देवाला खात्री दिलीये की ती आक्काचा नकार होकारामध्ये बदलून दाखवेन एवढंच नाही तर कबीर हा तिचा मुलगा असल्याची कबूलीही तिने देवाला दिलीये.
देवा मात्र अजूनही तिच्यासमोर त्याचं खरं रुप उलगडू देत नाहीये त्याला भीती वाटतेय की देवा डॉन आहे जर डॉ मोनिकाना कळलं तर ती त्यांना सोडून कायमची निघून जाईल तर दुसरीकडे ज्या पोटच्या मुलीसाठी देवाने मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश केलेला ती राधाच आता त्याच्या प्रेमाच्या विरोधात उभी असल्याने तिला कसं समजवावं याचा प्रश्न त्याला पडलाय.
देवा डॉ मोनिका कबीर आणि राधा हे नव्यानं बनू पहाणारं कुटुंब पुढे काय रुप घेणार हे पहाणं अर्थातच उत्सुकतेचं ठरेल. त्यामुळे पहायला विसरु नका दररोज रात्री नऊ वाजता डॉक्टर डॉन ही मालिका फक्त झी युवा वाहिनीवर.
No comments:
Post a Comment