Thursday, 16 May 2019

डेंग्यू दिनानिमीत्त भारतातील पहिली 'प्लेटलेट दाता' हेल्पलाइन सुरू


हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम २०१८च्या अहवालानुसार डेंग्यु रुग्णांत ५०० पटींनी वाढ
मुंबई, १६ मे २०१९: भारतात डेंग्युच्या रुग्णांची संख्या वाढतेच आहे. हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम २०१८च्या आकडेवारीनुसार २००९ मध्ये ६०,००० कमी रुग्ण होते. मात्र, २०१८ मध्ये हा आकडा २,८९,५७५वर पोहोचला म्हणजेच सुमारे ५०० पटींची वाढ झाली आहे. डेंग्यु झालेल्या रुग्णाच्या शरीरात रक्तातील प्लेटलेट्स कमी होत जातात आणि त्यातून अंतर्गत रक्तस्राव होतो. परिस्थिती गंभीर झाल्यास मृत्यूही ओढवतो. त्यामुळे, रुग्णाचे आयुष्य वाचवण्यासाठी त्याला तातडीने प्लेटलेट्स पुरवून प्लेटलेटची रोडावणारी संख्या रोखणे आवश्यक असते. मात्र, प्लेटलेट्स पाच दिवसांपेक्षा जास्त काळ साठवता येत नाहीत. त्यामुळे प्लेटलेट्स सहज उपलब्ध नसतात. १६ मे राष्ट्रीय डेंग्यु दिनानिमित्त गोदरेज हिटतर्फे ‘७८७८७८२०२०’ ही भारतातील पहिली प्लेटलेट दाता हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. मुंबई, दिल्ली एनसीआर, कोलकाता, बेंगळुरु, हैदराबाद आणि चेन्नईतील रुग्णांना साह्य करण्यास ही हेल्पलाइन बांधिल आहे. प्लेटलेट्स दात्यांच्या समुदायाकडून ते प्लेटलेट्स मिळवतील.
प्लेटलेट्सची गरज असलेले डेंग्यु रुग्ण किंवा नातेवाईक हिट प्लेटलेट हेल्पलाइन संपर्क करू शकतात. विनंती आल्यानंतर १.२५ लाख नोंदणीकृत दात्यांना कॉल किंवा एसएमएसच्या माध्यमातून सूचित केले जाते. प्लेटलेट् दाता रुग्णाला थेट ते जिथे असतील, त्या हॉस्पिटलमध्ये भेटतात किंवा प्लेटलेट्स रुग्णाला पाठवल्या जातात. रुग्णाला नजीकच्या अपोलो हॉस्पिटलमध्येही प्लेटलेट्स चढवता येतील. यासाठी रुग्णाला तिथे दाखल होण्याची गरज नाही. अपोलो हॉस्पिटल या हेल्पलाइनसाठीचे वैद्यकीय भागीदार आहेत. नागरिकांना प्लेटलेट डोनर म्हणून वेबसाइटच्या माध्यमातून स्वत:चे नाव नोंदवता येईल.
श्री. सुनिल कटारिया, सीईओ, गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडचे भारत आणि सार्क म्हणाले. "प्लेटलेट दाता हेल्पलाइन हे भारतातील एक अनोखे व्यासपीठ आहे. इथे दाता आणि डेंग्यु रुग्ण एकमेकांच्या संपर्कात येऊन प्लेटलेट्ससाठी एकमेकांना साह्य करतात. साठवता न येणाऱ्या प्लेटलेट्स रुग्णाला मिळण्यासाठी याची मदत होते. मागील वर्षभरात १ लाखाहून अधिक नागरिकांनी प्लेटलेट दाता म्हणून नोंदणी केली आहे. यातून ५ रुग्णांचे प्राण वाचवता आले. ही एक चांगली सुरुवात असली तरी डेंग्युमध्ये प्लेटलेट्स किती महत्त्वाचे असतात याबद्दल आणि अधिकाधिक प्लेटलेट दानाबद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे ही आम्ही आमची जबाबदारी समजतो."
श्रीम. संगिता रेड्डी, संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, अपोलो हॉस्पिटल्स या उपक्रमाबद्दल म्हणाल्या, "डासांमुळे फैलावणारा डेंग्यु हा जीवाणूजन्य आजार भारतातील सार्वजनिक आरोग्यापुढील एक मोठे आव्हान ठरत आहे. या आव्हानाचा सामना करण्यासाठी अपोलो हॉस्पिटलने प्लेटलेट डोनर समुदायाची उभारणी करण्यासाठी गोदरेज हिटसोबत सहयोग जोडला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही जनजागृतीतील दरी भरून काढणे आणि डेंग्युसारख्या आजारांशी लढण्यासाठी तयार स्रोत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत."
गोदरेज हिटने केलेल्या संशोधनानुसार, ९४ टक्के नागरिकांना डेंग्युमध्ये प्लेटलेट्स चढवण्याची गरज भासते अशी प्लेटलेट्सची गंभीर पातळी किती असते, हेच ठाऊक नाही. रक्त साठवता येते मात्र प्लेटलेट्स ५ दिवसांपेक्षा अधिक काळ साठवता येत नाहीत. ८० टक्के नागरिकांना हेसुद्धा ठाऊक नाही, असे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. प्लेटलेट्स फार टिकत नसल्याने दात्यांना प्रचंड मागणी असते. 'अॅपऱ्हेसिस' या प्रक्रियेच्या माध्यमातून एकाच दात्याकडून मोठ्या प्रमाणात प्लेटलेट्स घेतल्या जातात. ही प्रक्रिया अगदी सुरक्षित असून लगेचच दाता सामान्य कामे करू शकतो. खरे तर, आपले शरीर २४ तासांच्या आता प्लेटलेट्सची संख्या पुन्हा भरून काढते. प्लेटलेट दाता समुदायाचा भाग म्हणून गोदरेज हिटला सामान्य नागरिकांना प्लेटलेट्स दानाबद्दल आणि प्लेटलेट्स कमी झाल्याने डेंग्युच्या रुग्णांना असणारा धोका याबद्दल जागरुक करायचे आहे. मागील एक वर्षात, ही जागरुकता मोहीम भारतातील ५ दशलक्ष नागरिकांपर्यंत पोहोचली आहे. 
प्लेटलेट प्रदान करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करा
प्लेटलेट दाता म्हणून www.godrejhit.com/trackthebite येथे नोंदणी करा  / The Bite mobile app डाऊनलोड करा.

1 comment:

  1. Wow amazing article dear, I found what I was looking for, thanks for sharing this information

    ReplyDelete