Thursday, 30 May 2019

बिग बॉस मराठीच्या घरातला पहिला ग्रुप “KVR” काय आहे KVR ?

मुंबई ३० मे२०१९ : बिग बॉसचा कुठल्याही भाषेमधला सिझन असो या कार्यक्रमाटीम सदस्य, भांडण याचबरोबर या बिग बॉसच्या घरात बनले जाणारे ग्रुप... बिग बॉस मराठी सिझन पहिला मध्ये देखील सईपुष्कर आणि मेघा आणि त्यानंतर त्यांच्या ग्रुप मध्ये शर्मिष्ठाची भरती झाली होती... या ग्रुप मध्ये बरीच भांडण, वादगैरसमज झाले पण तरीही ते एकत्र होते... ग्रुप तुटतो कि अशी शंका देखील आली पण तो ग्रुप तुटता तुटता वाचला... याचबरोबर रेशम,सुशांत, राजेश, आस्ताद यांचा ग्रुप देखील बराच चर्चेत राहिला... आणि आता बिग बॉस मराठी सिझन २ चा पहिला ग्रुप तयार होताना दिसणार आहे आणि तो म्हणजे KVR – किशोरी शहाणे, विणा जगताप आणि रुपाली भोसले... याच बरोबर त्यांनी गप्पा मारण्यासाठी एक जागा देखील ठरवून ठेवली आहे आणि त्याचे “KVR कट्टा” असे नावं देखील ठेवले आहे ... या नावाला किशोरी शहाणे यांनी संमती दिली ...
या ग्रुप मध्ये अजून कोणाचा समावेश होईल या तिघींचा ग्रुप शेवटपर्यंत टिकून राहील ? हे बघणे रंजक असणार आहे ...

No comments:

Post a comment