Friday, 31 May 2019

बिग बॉस मराठीच्या घरात रंगणार अंताक्षरी !

 
मुंबई ३१ मे२०१९ : बिग बॉसच्या घरात एकदा सदस्य गेले कि त्यांचा मोबाईल, टीव्ही, पेपरअशा कुठल्याही करमणुकीच्या साधनांशी संबंध तुटतो...आणि याशिवाय रहाण हाच मोठा टास्क सदस्यांसमोर असतो. यांच्याजवळ कुठलही मनोरंजनाच साधन नसताना काही मोजकेच पर्याय उरतात. त्यामुळे संपूर्ण दिवस काय करायचं हा मोठा प्रश्न सदस्यांसमोर असतो. घरामध्ये कधी स्वत:बद्दलची माहिती सदस्यांना सांगणे, स्वयंपाक घरात रुचकर पदार्थ बनवणे, गप्पागोष्टी करणेबिग बॉस यांनी दिलेले टास्क करणे अशा प्रकारे सदस्य आपला वेळ घालवतात... सध्या बिग बॉसच्या घरामध्ये एकापेक्षा एक कलाकार असल्यामुळे कधी गाण्याची मैफल रंगते तर कधी स्वादिष्ट पदार्थ खायला मिळतात ... तर सुरेखाताई कधी लावणी आणि त्यातील अदा शिकवताना दिसतात...
आज बिग बॉसच्या घरामध्ये सुरेल अंताक्षरी रंगणार आहे... ज्यामध्ये अभिजित केळकर याने खूप सुंदर गाणी सादर केली जसे चंदा रे चंदा रेये राते ये मौसम... ससा रे ससा हे गाण देखील या अंताक्षरीत सदस्यांनी म्हंटले आहे... याचबरोबर वैशालीचा मधुर आवाज देखील बऱ्याचदा घरामध्ये ऐकू येतो आणि अंताक्षरीमध्ये देखील तिची सुरेल गाणी प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहेत...
तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ चा भाग आज रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

No comments:

Post a comment