Thursday, 30 May 2019

बिग बॉस मराठीच्या घरात आज काय घडणार ?


-          विणा आणि शिवानी मध्ये वाद
-          अभिजित बिचुकलेंच्या डोळ्यात का आले पाणी ?
-          “आम्ही कोकणचे सांगताना आमचं भरून येई उर” - दिगंबर नाईक
मुंबई ३० मे, २०१९ :अनेक लोकं एकत्र आले कि भांड्याला भांड लागणारच, शब्दाला शब्द लागणारच... आणि गैरसमज होणारच... आणि बिग बॉसचं घर म्हंटल कि, हे स्वाभावाकीच आहे ... कारण वेगवेगळ्या क्षेत्रातील १५ कलाकार एकत्र आले म्हणजे एकमेकांचा स्वभाव समजण, त्यांच्या सवयी कळण याला वेळ लागतोच... मराठी टेलिव्हिजनवरील दोन लोकप्रिय अभिनेत्री राधा म्हणजेच विणा जगताप आणि शिवानी सुर्वे यांचं घरामध्ये तसं चागलं जमत होत... पण आता या दोघींमध्ये वाद होताना दिसणार आहे ... आणि हा वाद देखील अभिजित बिचुकले यांच्यावरूनच आहे ... “मला नको सांगूस कसं बोलायचं” असं शिवानीच म्हणणे आहे तर विणाचा मुद्दा आहे किचन मध्ये आरडाओरडा नको ... आता नक्की काय झालं ? वाद मिटणार का ? हे आजच्या भागामध्ये कळेलच...
बिग बॉस मराठी सिझन २ सुरु झाल्यापासून अभिजित बिचुकले हे नाव चर्चेत आहे ... पण अभिजित केळकर याच्याशी बोलताना त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी का आले ? त्यांनी कोणत्या गोष्टी सांगितल्या या दरम्यान सांगितल्या ? हे आजच्या भागामध्ये कळेलच ... दिगंबर नाईक यांनी सुंदर कविता सादर केली... “रत्नागिरी,देवगड, कणकवली कट्टा, मालवण, राजापूर आणि आम्ही कोकणचे सांगताना आमचं भरून येई उर”अशा शब्दांत त्यांनी गाण्याची सुरुवात केलीआणि याचबरोबर कोकणचे कौतुक आणि वर्णन त्यांनी खूप सुंदररीत्या शब्दांत केलं... याचबरोबर त्यांनी गाऱ्हांण देखील सादर केले ज्याला घरातील बाकीच्या सदस्यांनी देखील साथ दिली...
अजून या घरामध्ये काय काय घडेल ? काय गंमती जमती घडतील ? कोणाची मैत्री होईल ? तर कोणाचे वाद होतील ?हे  जाणून घेण्यासाठी बघा बिग बॉस मराठी सिझन २ रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

No comments:

Post a comment