Friday, 31 May 2019

बिग बॉस मराठीच्या घरातली “मॉनिटर” शिवानी


मुंबई ३१ मे, २०१९ : बिग बॉस मराठी सिझन २ च्या घरामध्ये अजून पहिला आठवडा संपला पण नाही आणि भांडणवादआरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत ... तर एकीकडे मैत्री आणि ग्रुप्स तयार होण्यास सुरुवात झाली आहे... दुसरीकडे ज्यांच्यामध्ये कटुता आली आहे त्यांनी ती कटुता विसरून पुन्हा चांगले संबंध कसे होतील या दिशेने प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे... बिग बॉसच्या घरामध्ये अभिजित बिचुकले पहिल्या दिवसापासून चर्चेत राहिले आहेत ... शिवानी सुर्वे आणि अभिजित बिचुकले यांच्या मध्ये देखील बरेच वाद झाले पण, आता शिवानी सुर्वे चक्क बिचुकले यांना मदत केली... त्यांच्यामधील भांडण आणि वाद विसरून तिने त्यांची मदत करण्याचा पवित्रा हाती घेतला...
शिवानीने त्यांची बॅगत्यांचे कपडे आवरून ठेवायला सांगितले आणि त्यांची जागा संपूर्ण पणे स्वच्छ करून घेत असताना अभिजित बिचुकले यांनी शिवानीला मॉनिटर असे नावं ठेवले...

No comments:

Post a comment