Thursday, 9 May 2019

‘अपरिचित पु. ल.’


'पुलंच्या साहित्यावर मनापासून प्रेम करणारा खूप मोठा वाचकवर्ग आहे. त्यांच्या लिखाणाचे गारूड सर्वच पिढ्यांवर पसरले आहे. पुलंच्या साहित्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या त्यांच्या चाहत्यांसाठी पु. ल. देशपांडे ह्यांच्या काहीशा अपरिचित साहित्याचा वाचिक व संगीतमय अविष्कार अनुभवण्याची संधी अपरिचित पु. ल. या कार्यक्रमातून मिळणार आहे. प्रसाद फणसे आयोजित व शब्दवेधपुणे निर्मित अपरिचित पु. ल. हा अनोखा कार्यक्रमशनिवार २५ मे रोजी रात्री ८.३० वा. रविंद्र नाट्यमंदिर प्रभादेवी (मिनी थिएटर ) इथे संपन्न होणार आहे.
चंद्रकांत काळेडॉ. सतीश आळेकर आणि गिरीश कुलकर्णी हे कलाकार या कार्यक्रमाचे सादरीकरण करणार असून संकलन व दिग्दर्शन चंद्रकांत काळे यांचे आहे. संगीताची जबाबदारी नरेंद्र भिडे सांभाळणार आहेत. वादक म्हणून अपूर्व द्रविड (तबला)आदित्य मोघे (हार्मोनिअम] असणार आहेत.
हा कार्यक्रम सशुल्क असूनप्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्वावर आहे. अधिक माहितीसाठी प्रसाद फणसे यांच्याशी ९८२०७७१७१८ / ९८६९२०७१२५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment