मुंबई १८ जुलै, २०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पासून “मर्डर मिस्ट्री” हे साप्ताहिक कार्य रंगत आहे... या कार्यामध्ये सदस्याचा सांकेतिक खून करायचा आहे... ज्याप्रमाणे काल किशोरीताईचा त्यांच्या परिवाराचे फोटोज स्विमिंग पूलमध्ये टाकून शिवने केला होता. आज हीना आणि माधवमध्ये या टास्क दरम्यान वाद होताना दिसणार आहे... तस बघायला गेल तर नेहा, हीना आणि माधवमधील वाद संपायचे नाव घेत नाही... या तिघांमधील वाद दिवसंेदिवस वाढतच चालला आहे... काल हीनाने नेहाला तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या नवऱ्याने पाठवलेले पत्र लपवले ज्याबद्दल नेहाला काहीच माहिती नाही... आणि यामध्ये नंतर विणाने देखील तिची साथ दिली... आज माधववर हीना चिडली आहे... कारण, हीनाचा हरवलेला पाऊच कुणीतरी लपवून ठेवला आहे आणि ते तिला कळाले... तिला वाटत आहे कि माधवने तो लपवला आहे त्यावर हीना त्याला म्हणाली, तू इकडे ये मला तो पाऊच काढून दे... त्यावर माधव म्हणाला, मी हात नाही लावणार माझी विकेट जाईल ...माधवचे म्हणणे आहे तो पाऊच मिळाला ना तुला हरवला नाही ना... त्यावर हीनाने माधवला विचारले कोणी केले ते ? त्यावर माधव तिला म्हणाला,तू एपिसोड नंतर कॅमेरामध्ये फुटेज बघ. त्यावर हीना अजूनच चिडली. माधव म्हणाला आम्हांला काय माहिती कोणी लपवला ? कोणी ठेवला ? त्यावर हीनाचे म्हणणे आहे, कि तिथे पण कोणतरी काहीतरी लिहलेले आहे ते कोणी लिहिले ?
यावर माधवचा पारा चढला आणि तो हीनाला म्हणाला, माझ्या नदी लागू नकोस, माझ्याशी वाद नको घालूस ... मी काहीच नाही केले. आणि माधवचा आवाज हे बोलत असताना चढला. माधव हीनाला म्हणाला तू स्वत:च लिहिलं असशील.. तूच बसली आहेस इथे आणि तूच लपवून ठेवलास तो पाऊच तिकडे.
बघूया आजच्या भागामध्ये पुढे काय होते ? तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
No comments:
Post a Comment