मुंबई ३ जुलै, २०१९ : बिग बॉस यांनी काल सगळ्या सदस्यांना एका खोलीमध्ये बंद केले होते... त्या दरम्यानच अभिजीत केळकरने बिग बॉस यांनी दिलेल्या टास्क मध्ये किशोरीताईचे नाव घेतले... आणि यावरून काही गैरसमज दूर करण्यासाठी किशोरी शहाणे आणि अभिजीत केळकर बोलत असताना वैशाली, नेहा यांनी सांगितले आता टास्क दरम्यानच तु सांगितले कि, किशोरीताई सोबत अडकलेले आवडणार नाही आणि आता त्यांच्याबरोबरच तु गप्पा मारतो आहेस. टास्कनंतर बोल त्यांच्याशी. त्यानंतर नेहा, माधव, वैशाली, हीना आणि अभिजीत केळकर यांच्यामध्ये चर्चा झाली... आणि पुढे वाद – विवाद, आरोप वाढतच गेले...
नेहाच म्हणणं होत कि, आता ग्रुपमध्ये त्या तिघीच उरल्या आहेत. त्यांच्याशी माझा संबंध नाही, मला घेण देण नाही... पण त्या आपल्या ग्रुपमध्ये सगळ्यांकडे येऊन त्यांच्यापरीने पूर्ण प्रयत्न करत आहेत कि आपल्या ग्रुपमधील सदस्य त्यांच्या ग्रुप मध्ये जातील... आपला ग्रुप चांगला आहे, आपल्यामध्ये जे काही बोलण आहे त्याचा संबंध टास्कशी नसून नॉमिनेशनशी येतो... त्यावर अभिजीतचे म्हणणे होते, पण त्या माझ्याशी त्यांच्या मनातील काही गोष्टी, गैरसमज दूर करत होत्या, त्याचा आणि तू जे बोलते आहेस त्याचा काहीच संबंध नाहीये...आणि मी त्यांच्याशी बोललो याचा अर्थ असा नाही माझे मत बदलेल... तो पुढे म्हणाला परागशी जेंव्हा तू बोलत होतीस तेंव्हा मी असं बोलू शकलो असतो तुझ्याशी तो इतक वाईट वागला, मग तू का बोलीस ? त्यावर नेहा चिडली तेंव्हा आणि म्हणाली हे तेंव्हाच का नाही बोलास असे बोलल्यावर अभिजीत म्हणाला प्रत्येक छोटी गोष्ट मी नाही सांगू शकत आणि हा विषय वाढतच गेला...
यानंतर नेहा चिडली आणि म्हणाली, तुम्हांला माझ्या बोलण्यावर, आवाजावर, प्रत्येक गोष्टीवर आक्षेप असेल तर मला माफ करा... नॉमिनेट करा, ग्रुप मध्ये ठेवा ठेऊ नका तुमचा प्रश्न आहे... तुम्ही माझा उपयोग करून घेता... या वाक्यावर माधव, अभिजीत केळकर सगळयानीच आक्षेप घेतला. त्यावर पुढे म्हणाली आणि मला भीती आहे कि, उद्या अभिजीत किंवा हीना कोणीही त्यांच्या ग्रुप मधील जातील... अभिजीत केळकर त्यावर म्हणाला अशी भीतीच वाटायला नको तुला विश्वास नाहीये का आमच्यावर ? त्यावर नेहाने विचारले तुमचा आहे का माझ्यावर विश्वास ? तर अभिजीत आणि सगळेच म्हणले नक्कीच आहे ...
No comments:
Post a Comment