Tuesday, 16 July 2019

लाल बहादूर शास्री हायस्कूल दहागाव मध्ये ई-लर्निंग अभ्यासवर्गांचे उद्घाटन आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ

मंडणगड तालुक्यातील दहागाव येथे LBSH  माजी विद्यार्थी मंचाच्या वतीने इयत्ता  वी ते १० वी वर्गासाठी  LED स्मार्ट टीव्ही चे उदघाटन आणि गुणवंतविदयार्थी सोहळा कार्यक्रम शनिवार दि १३--२०१९ रोजी लाल बहादूर शास्त्री हायस्कूल दहागाव येथे पार पडला.
यावेळी अश्विनी मोरे चॅरिटेबल ट्रस्ट (मुंबईमार्फत ४३ इंच पाच स्मार्ट टीव्ही शाळेला प्रदान करण्यात आले। त्याच बरोबर विद्यार्थ्यांना मराठी-इंग्रजीचाऊस डिक्शनरी चे वाटप करून सन २०१८-१९ दहावी परीक्षेत पास होऊन प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा मंचातर्फे सन्मानचिन्ह आणिरोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला।
अशा प्रकारचे विविध उपक्रम मंचाच्या पटलावर आहेत असे प्रस्तावपर भाषणात मंचाचे सेक्रेटरी श्री दीपक गोरीवले यांनी सांगितले.
शालेय अभ्यासक्रमा मध्ये भविष्यात  लर्निंग चा वापर मोठ्या प्रमाणत होणार असून त्याचा पुरेपूर फायदा येथील  मुलांना कसा घेता येईल यासाठी मंचसर्वोतोपरी प्रयत्न करेल असे मंचाचे अध्यक्ष  श्री सुभाष तांबे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात नमूद केले.
यावेळी मंचाचे उपक्रम आम्ही  वेबसाईटफेकबुक आणि व्हाट्सअप्प सोशल मिडियामाध्यमातून कशाप्रकारे प्रसार करत आहोत याची माहिती माजीसेक्रेटरी श्री सुभाष दळवी यांनी दिली.यावेळी अश्विनी मोरे चॅरिटेबल ट्रस्ट,मुंबईचे अध्यक्ष श्री रवींद्र मोरे श्री सुरेंद्र मोरे श्री अमेय मोरे उपस्थित होते तसेचशाळेचे मुख्याध्यापक श्रीपाटील सर यांच्यासह शिक्षक,कर्मचारी,शालेय कमेटीचे पदाधिकारी हजर होते
माजी शिक्षक श्री खोचरे ,श्री चव्हाण आणि पाटणकर सरांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून मंचाला प्रोत्साहित केले.
श्री दिलीप मराठे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केलेमंचाचा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सह सेक्रेटरी श्री नरेश चव्हाण  तसेच पदाधिकारी श्रीमनोज वेदक श्री नंदकुमार दळवी  आणि संपूर्ण  कार्यकारिणीने मेहनत घेतलीकार्यकारिणी सदस्य श्री संदीप सुखदरे यांनी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाचीसांगता केली
सुभाष दळवी,माजी सेक्रेटरी
LBSH माजी विद्यार्थी मंच

No comments:

Post a Comment