Wednesday, 10 July 2019

बिग बॉस मराठी सिझन २ – दिवस ४५ ! “आपण दोघी जाऊ नॉमिनेशनमध्ये” – वीणा घरामध्ये रंगणार नॉमिनेशन टास्क - कोण सेफ होणार ? कोण नॉमिनेशन मध्ये जाणार ?

मुंबई १० जुलै२०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये प्रत्येक मिनिटाला नाती बदलताना दिसत आहेत... कोण कधी कोणाच्या विरोधात बोलेल आणि कधी बाजूने याचा नेम नाही... कोण कोणाच्या ग्रुपमध्ये जाईल हे सुध्दा सांगता नाही. एकमेकांमध्येच बरेच गैरसमज आहेतत्यामुळे सदस्यांना कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही हेच कळत नाहीये...... वीणाने काल रुपालीसोबत असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आणि रुपालीने देखील तिला सांगितले तू कशीही वागलीस तरीदेखील मी तुझ्या पाठीशी उभी असेन. त्यामध्ये काल किशोरी शहाणे यांना वीणाने स्पष्ट सांगितले कि, मी कोणाच्या ग्रुपमध्ये नाही मी वैयक्तिक खेळत आहे... तररुपालीने किशोरीताईना आधार दिला आणि सांगितले जस आपण परागच्या वेळेस केले तसेच यावेळेस देखील वीणाला सांगू आणि पुढे जाऊ... याचसोबत घरामध्ये काल अभिजीत आणि रुपाली मध्ये कॅप्टनसी टास्क रंगला...
आज घरामध्ये घरामध्ये नॉमिनेशन टास्क रंगणार आहे ... ज्यामध्ये  समोरच्या स्पर्धकाचे तिकीट मिळवून सेफ होण्याचा प्रयत्न करायचा आहे. या टास्कदरम्यान नेहाने वीणाला सांगितले आपल्या दोघींमध्ये कोणी एक सेफ होऊ शकत त्यावर वीणाने सांगितले तू मला दे तिकीट आणि सेफ कर त्यावर नेहाचे म्हणणे पडले या आठवड्यात मला रिस्क आहे त्यामुळे मला दिल्स्त्र बर होईल... त्यावर वीणाने सांगितलेमला नाही मिळत आहेतुलासुध्दा नाही मिळणार... दोघेही नॉमिनेशनमध्ये जाऊ”.   आता सदस्य समोरच्या सदस्याला तिकीट देऊन सेफ होण्याची संधी देतील कोण कोण नॉमिनेशनमध्ये जाईल कोण सेफ होईल हे बघणे रंजक असणार आहे... तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

No comments:

Post a Comment