Wednesday, 10 July 2019

बिग बॉस मराठी सिझन २ – हिना नेहासमोर मांडणार तिचे ठाम मत ! “जर या घरामध्ये कोणाला एकट पाडलं जात असेल तर मी त्याच्याशी बोलणार’ – हिना


 
मुंबई १० जुलै,२०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री घेऊन आलेली हिना पांचाळने घरामध्ये काही सदस्यांची मने जिंकली तर काहींसोबत तिचे मतभेद झाले, भांडण झाली. यामध्ये वीणा आणि शिव सोबत तिचे बऱ्याच वेळेस खटके उडाले... तर माधव आणि नेहा तिचे जवळचे मित्र बनले... नेहाच्या ती जवळची मैत्रीण बनली, प्रत्येक छोटी मोठी गोष्टतिला खटकणारी गोष्टतिने नेहाला तोडांवर सांगितली आहेमग ते तिला खटकल तरी चालेल... आज देखील नेहा,माधव आणि हिना मध्ये एका विषयावर चर्चा होत असताना तिने तिचे स्पष्ट मत मांडले...
नेहाचे म्हणणे होतेअभिजीत आणि वैशाली जर कोणामध्ये भांडण झाले असेल तर ते अजून वाढविण्याचा प्रयत्न करतात आपण ते पण करुया नको... लोकांच्या कोणत्याच गोष्टीमध्ये आपण पडायचे नाही. नेहा पुढे म्हणाली, जर त्यांचे भांडण झाले आहे तर त्यांचे त्यांना मिटवू देकोणाच्याही मध्ये जाऊ नका... त्यावर हिनाने स्पष्टीकरण दिले“मी नाही जात कोणच्यामध्ये, समोरचा माणूस जर येत असेल तर मी त्याच्याकडे दुर्लक्ष नाही करू शकत. मला अस वाटतजर त्यांना वाटत आहे बोलायचे आहे तर त्यांना बोलू दे... घरामध्ये जर कोणाला एकट वाटत आहे किंवा त्याला एकट पाडलं जात असेल तर मी त्याच्याकडे जाणार बोलायला... त्या माणसाशी पाच मिनीट बोलले तर माझ काहीच बिघडणार नाहीये”. कालच नेहाचे हिनाला म्हणणे होते कि, मी कधीच तुला वा कोणाला सांगत नाही कोणाशी बोलायचं आणि कोणाशी नाहीतर मला सगळे का म्हणतात मी डॉमिनेटीग आहे. आता याला काय म्हणावे यावर माधव आणि हिना अजून काय स्पष्टीकरण देतील हे आजच्या भागामध्ये बघूया... तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर. 

No comments:

Post a Comment