Friday, 19 July 2019

बिग बॉस मराठी सिझन २ – दिवस ५४ ! रुपाली, नेहाचा हीनाबरोबर वाद “नीट बोलायचं माझ्याशी, मी नोकर नाहीये तुझी” – रुपाली


 
मुंबई १९ जुलै२०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरु असलेल्या मर्डर मिस्ट्री या साप्ताहिक कार्यामध्ये काल वैशाली आणि शिवचा सांकेतिक खून करण्यात शिवानी यशस्वी ठरली... आज बघूया घरामध्ये शिवानी आणि नेहा मिळून कोणाचा खून करणार आहे... काल बिग बॉस यांनी शिवला सामान्य नागरिक बनवून नेहाला खुनी केले आणि तशी सूचना अभिजीत केळकरला देखील दिली... आज घरामध्ये रुपालीनेहाची हीनासोबत वादवादी होणार आहे... हीना आणी रुपाली मध्ये किचनच्या कामावरून वाद होताना दिसणार आहे... हीनाने नेहाला येऊन सांगितले मला एक पोळी पाहिजे... त्यावर रूपालीचे म्हणणे पडले lunch ची dutyकेलीस का तू त्यावर हीना म्हणाली मी भांडी घासली लावली नाही जे माझ काम आहे ते मी केले... त्यावर रूपालीचे म्हणणे पडले, मी तुला सांगितले होते,घासलेली भांडी लावायची, ओटा स्वच्छ करायचा... त्यावर हीनाचे म्हणणे होते मी ब्रेकफास्टची भांडी मी घासली. रुपाली त्यावर म्हणाली तू नाही किशोरीताईनी घासली... आणि हीनाचा आवज चढला ... मी घासली आहेत रुपाली तू नाही नको म्हणूस ... त्यावर रुपालीने हीनाला खडसावलेहळू आवाजात बोल माझ्याशी “नीट बोलायचं माझ्याशीमी नोकर नाहीये तुझी” आणि हा वाद वाढतच गेला...
हीनाने रुपालीला सांगितले तू कॅप्टन आहेस ना मग ते काम कर ... नेहाने मध्यस्ती केली आणि रुपालीला सांगितले कशाला तोंडाला लागतेस तिच्या”... हीनाने मुद्दा मांडला, एक तर आम्हांला जे जेवण पाहिजे ते नाही मिळत आम्हांला”... त्यावर नेहाने विचारले काय पाहिजे तुला जेवायला सांग... नेहा आणि हीनामध्ये वाद सुरु झाला आणि तो टोकाला गेला... नेहाचे म्हणणे होते तो आत चुकून जरी लागला तर बाहेर जाशील...
आता वाद कुठपर्यंत जाईल बघूया आजच्या बिग बॉस मराठी सिझन २ च्या भागामध्ये रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

No comments:

Post a Comment