Friday 12 July 2019

बिग बॉस मराठी सिझन २ – दिवस ४७ ! अभिजीत, शिव आणि वैशाली मिळून कसली योजना आखत आहेत ? माधवचे अभिजीतविषयी काय आहे म्हणणे ...


 
मुंबई १२ जुलै२०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल बिग बॉसनी घरातील सदस्यांवर “एक डाव भुताचा” हे साप्ताहिक कार्य सोपवले... ज्यामध्ये टीम A - रुपाली, नेहा, हिना आणि माधव तर टीम B - वैशालीशिव, वीणाअभिजीत केळकर आहेत आणि किशोरी शहाणे या कार्याच्या संचालिका आहेत... भूत असलेल्या टीमने काळे कपडे घालायचे आहेत आणि शिकारी असलेल्या टीमने पांढरे कपडे.काल वीणाअभिजीत आणि शिव सेफमध्ये गेले तर वैशाली सेफमध्ये न जाऊ शकल्याने ती कॅप्टनसीच्या स्पर्धेतून बाहेर पडली...अभिजीतवीणा आणि शिवचे असे म्हणणे पडले नेहा आणि हिनाला काही करून कॅप्टन नाही होऊ द्यायचे.  आता आजच्या भागमध्ये काय होणार टीम B मधील कोणता सदस्य कॅप्टनसीच्या स्पर्धेतून बाहेर जाणार कोण जिंकणार काय काय खलबत रचली जाणार ?टीम A च्या बाहुल्या कुठे कुठे लपवल्या जाणार हे बघणे रंजक असणार आहे ... तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
आजच्या भागामध्ये अभिजीत, वैशाली आणि शिव यांच्यामध्ये टीम A च्या बाहुल्या कुठे कुठे लपवता येऊ शकतील याबद्दल गहन चर्चा रंगणार आहे... ज्यामध्ये अभिजीतचे म्हणणे आहे मी कालच विचार करून ठेवला आहे त्यांच्या बाहुल्या आपण कुठे कुठे लपवू शकतो...  अभिजीतने हेच शिव आणि वैशालीला सांगितले कॅमेराच्या वरतीतुळशीच्या खाली खड्डा आहे तिथे लपवू शकतो... आता बघूया यांनी लपवलेल्या बाहुल्या टीम A शोधू शकतील का ?
माधव किशोरीताई आणि नेहाबरोबर चर्चा करत आहे कि, अभिजीतने मला विचारले तुझ्याकडे दोन पांढऱ्या पॅन्ट आहेत का माझ्याकडे एक ट्राऊसर आहे पण मी ती नाही देणार... अजून एक आहे जी मी घातली आहे पण ती खराब झाली आहे... त्यावर अभिजीतचे म्हणणे होते माझी इतकी धावपळ नाहीयेतर माधव म्हणाला माझी तरी कुठे होती धावपळ काल पण झालीच ना खराब ... माधव म्हणाला खराब नाही होणार असे म्हणाला पण झाली तर मी धुवून देईन असे नाही म्हणाला... ते म्हणाला  असता तर मी दिली असती... त्यावर अभिजीत म्हणाला माझ झाल काम आणि गेला... माधवचे म्हणणे होते, विचारलं तर सांगना मी धुवून देतोमी टीशर्ट देखील दिले असते. माधव पुढे म्हणालाजर तुला एखाद्या गोष्टीची गरज आहे तर ती कशी मागितली पाहिजेत्याला हे कळत कि भाकरी बनविण्यासाठी तेल मागण्याची पद्धत नीट पाहिजे तर एखाद्याला विनंती करताना ते कसं बोललो पाहिजे हे पण कळायला हवं ना किशोरीताईचे देखील म्हणणे होतेप्लीज आपण म्हणूनच शकतो.

No comments:

Post a Comment