Wednesday, 17 July 2019

बिग बॉस मराठी सिझन २ – दिवस ५२ ! घरामध्ये रंगणार मर्डर मिस्ट्री साप्ताहिक कार्य रुपाली बनली घराची नवी कॅप्टन


 
मुंबई १७ जुलै२०१९ : काल घरामध्ये कॅप्टनसी टास्क रंगला आणि त्यामध्ये रुपालीने बाजी मारली आणि घराची नवी कॅप्टन बनली... आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आगळावेगळा टास्क रंगणार आहे... बिग बॉसच्या घरावर एक मोठे संकट आले असून या संकटातून बाहेर पडण्यासाठी बिग बॉस सदस्यांवर मर्डर मिस्ट्री हे साप्ताहिक कार्य सोपवणार आहेत. या कार्यानुसार बिग बॉस मराठीच्या घरात सांकेतिक खून होणार आहे... प्रत्येक बजरला खून झालेला सदस्य कॅप्टनपदाच्या शर्यतीमधून बाहेर पडेल... शेवटच्या बजरनंतर खुनापासून वाचलेल्या सदस्याला कॅप्टन पदाच्या शर्यतीत फायदा होईल असे बिग बॉसनी जाहीर केले... बिग बॉस यांनी नेहा आणि शिवला या कार्यामध्ये काय व्हायला आवडेल खुनी कि सामान्य नागरिक असे विचारले यावर नेहा आणि शिवने खुनी व्हायला आवडले असे उत्तर दिले आता बघुया यांच्या नशिबामध्ये काय आहे ?
तेंव्हा पुढे टास्क मध्ये काय होते ते आज बघायला विसरून नका आजच्या बिग बॉस मराठीच्या भागामध्ये रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

No comments:

Post a Comment