Tuesday, 9 July 2019

बिग बॉस मराठी सिझन २ – वीणाच्या वागण्यामुळे रुपाली दुखावली...

मुंबई ९ जुलै२०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रुपाली आणि वीणा यांची खुप घनिष्ठ मैत्री आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे ... आणि हि गोष्ट या दोघींनीही वेळोवेळी घरातल्या सदस्यांना सांगितली देखील आहे... एकच फाईट वातावरण टाईट या टास्कमध्ये देखील रुपालीने तिचा किशोरी शहाणे यांच्यावरचा राग व्यक्त करताना हि गोष्ट सांगितली... वीणा आणि शिवबद्दल जी गोष्ट बोलीस ती मला नाही आवडली कारण मी तिच्याबद्दल “Over Protective” आहे आणि राहीन... शिवला देखील रुपाली बऱ्याचदा टोकताना दिसते कि, मी आणि वीणा बोलत असताना किशोरीताईला देखील येऊ देत नाही त्यामुळे तू नको अस करुस...
पण आता या मैत्रीमध्ये कुठेतरी फुट पडते आहे असे दिसून येत आहे ... काल देखील बिग बॉस यांनी दिलेल्या शिक्षेचे गांभीर्य दोघांना नाही असे तिचे म्हणणे पडले... आज देखील वीणाबद्दल बोलताना तिने घरतील सदस्यांना सांगितले“हक्क हा फक्त एका बाजूनेच नसतो तो दोन्ही बाजूंनी हवा. मी काय पूर्ण आजारी आहे अशातला भाग नाहीयेपण मला खरच दुखत आहे पायाला...कोणीच नाहीये मला इथे मी हे बोलते आहे पण, माझ्याकडे “शिव” सारखा कोणी मित्र नाहीयेजो मला भरवेल किंवा दिवसभर माझी काळजी घेईल. पण तू जर ठामपणे म्हणतेस तू ती व्यक्ती आहेस मग तू दिसत नाहीस. वागना मग तशीकाल  मी रात्री झोपले तेंव्हा सुध्दा रडत होतेपण बाजूला झोपलेल्या माणसाच्या मनामध्ये इतका राग आहे  कि मला एकदाही विचारलं नाही खरच त्रास होतो आहे का खूप दुखत आहे का?  
या सगळ्या मुद्द्यावर वैशाली म्हणाली, पण तुम्ही एकमेकींना खूप समजून घेता अस जे म्हणता जर ते नाहीये अस तू म्हणतेस तर मला तुमच्या नात्यावर प्रश्नचिन्ह पडलं आहे. यावर अभिजीत केळकर म्हणालामला वाटत किही खूप वैयक्तिक गोष्ट आहे... त्या दोघींनासुध्दा कळलेले आहे एकमेकींना काय वाटत आहे... मला अस वाटत त्या दोघींनी एकमेकींशी बोलावं किंवा नाही बोलावं हे त्यांना ठरवू दे ... कोणी कोणाची बाजू घेऊ नका आणि कोणाच्या विरुध्द देखील बोलू नका. याबबत हिनाशी देखील रुपाली बोलताना काय झाल पुन्हा सांगितले आणि त्यावर हीनाचे म्हणणे पडले वीणाचे “कामा पुरता कामा” असत तस आहे ...

No comments:

Post a Comment