'झी युवा' वाहिनीवर एक नवीकोरी गाण्याची स्पर्धा ७ ऑगस्टपासून सुरु होत आहे. बुधवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता हा कार्यक्रम पाहत येईल. 'युवा सिंगर एक नंबर' यानव्या कार्यक्रमाचा पहिला प्रोमो पाहून प्रेक्षकांना पडलेला 'जज कोण आहे माहित आहे का?' हा प्रश्न अखेर सुटला आहे. कार्यक्रमाच्या नव्या प्रोमोमध्ये वैभव मांगलेपरीक्षकाच्या खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. हा अभिनेता आपले निराळे कलागुण जगासमोर आणत असतांना, गायिका सावनी शेंडे सुद्धा परीक्षकाच्या भूमिकेत दिसणारआहे. उत्कृष्ट शास्त्रीय संगीत गायिका असणारी सावनी, या कार्यक्रमाच्या माध्यमातून परीक्षक म्हणून पदार्पण करणार आहे. संगीतातील सूर आणि राग यांच्यावरसावनीचे खास प्रभुत्व आहे. तिच्या मधुर आवाजाने तिने नेहमीच प्रेक्षकांना आनंद दिला आहे. अशा परीक्षकासमोर आपल्या गाण्याचे सादरीकरण करून स्पर्धकांना आपलीछाप पाडायची आहे. प्रत्येक स्पर्धकासाठी हे काम निश्चतपणे आव्हानात्मक असणार आहे. या आव्हानाचा मुकाबला करू शकणारे स्पर्धकच या स्पर्धेत टिकाव धरतील. याआगळ्यावेगळ्या कार्यक्रमातील स्पर्धकांकडून असणाऱ्या मोठ्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांना पेलावी लागेल. अर्थातच, या स्पर्धेतील परीक्षकांकडून होणारेमार्गदर्शन या युवा गायकांसाठी खूप मोठी पर्वणी असणार आहे.
स्पर्धेच्या परीक्षकांविषयीची उत्सुकता संपल्यानंतर, या कार्क्रमासाठीची प्रेक्षकांची उत्सुकता मात्र वाढलेली दिसते.
No comments:
Post a Comment