झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिलातसंच या २ भागावर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. याचं बहुतांश श्रेय हे मालिकेतील कलाकारांनाही जातं. मुख्य म्हणजे 'रात्रीस खेळ चाले २', मधीलकलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष दाद मिळत आहे. आता हि मालिका एका रंजक वळणावर आली आहे.
नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं कि, छायाचं राजग्या बरोबरचं प्रेमप्रकरण सगळ्यांसमोर उघड होतं म्हणून अण्णा तिच्यावर जबरदस्ती करून तिला खोलीत डांबूनठेवतात. अशाच परिस्तिथीत एक स्थळ तिला बघायला येत आणि ते दोघेही एकमेकांना होकार देतात. राजग्याचा जीव वाचावा म्हणून नाईलाजाने छाया लग्नास होकारदेते. एक मोठं भाऊ म्हणून माधव गोष्टी नीट करायचं असं ठरवतो पण तसं काही घडत नाही. छायावरील होणारा अन्याय सहन न झाल्यामुळे तो घराबाहेर पडण्याचानिर्णय घेतो. आता छायाचं लग्न २ दिवसात होणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. पण छायाचं लग्न झाल्यावर त्याच दिवशी तिच्यावर एक संकट कोसळणार आहे.लग्नाच्याच रात्री तिच्या आयुष्यातील सगळ्यात दुर्दैवी घटना घडणार आहे. छायासोबत काय अघटित घडणार हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.
No comments:
Post a Comment