Thursday, 26 September 2019

'झी टॉकीज' देणार 'धप्पा'!!!

आज दहा वर्षांहून अधिक काळ 'झी टॉकीज' वाहिनी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. निरनिराळे सदाबहार चित्रपट, विविध कथाबाह्य कार्यक्रम, नाटकं अशा दर्जेदार कलाकृतींची पेशकश झी टॉकीज करत आले आहे. याशिवाय नवनवीन चित्रपटांचे 'वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर' सुद्धा या वाहिनीवर पाहायला मिळतात. 'झी टॉकीज' वाहिनीवर कुठल्या सिनेमाचा प्रीमियर होणार, याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. उत्साही प्रेक्षकांचा रसभंग होणार नाही याची काळजी नेहमीच ही वाहिनी घेत असते. येत्या रविवारी, म्हणजेच २९ सप्टेंबरला सुद्धा, असाच एक उत्तम चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता 'धप्पा' हा चित्रपट पाहता येईल.

लपाछुपीच्या खेळात 'धप्पा' या शब्दाला खास महत्त्व आहे. ज्याच्यावर राज्य आहे, त्याला बेसावध असतांना पकडणं, म्हणजेच हा धप्पा! मराठी चित्रपट सृष्टीतील एक अनोखा प्रयोग असणारा हा चित्रपट, समाजाच्या खुज्या विचारांना असाच धप्पा देणारा आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने एका सोसायटीमधील लहान मुले एक नाटुकले करायचे ठरवतात. 'झाडे वाचावा' हा संदेश पोचवणाऱ्या या नाटुकल्यात, येशू ख्रिस्ताची एक भूमिका मुलांनी घेतलेली असते. गणपतीव्यतिरिक्त इतर कुठल्याही देवाचा या नाटकात समावेश करू नये, असे या मुलांना सांगण्यात येते. समाजातील अत्यंत संकुचित अशी ही मानसिकता, या चित्रपटाच्या माध्यामातून दाखवण्यात आली आहे. अशाप्रकारची अट घातली गेल्यानंतर, ही मुलं नेमकं काय करतात? त्यांचे हे नाटुकले पूर्ण होते की नाही ? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पाहायला विसरू नका, धप्पा!!
रविवार, २९ सप्टेंबर रोजी, दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता, फक्त आपल्या लाडक्या 'झी टॉकीज'वर!!!!

No comments:

Post a Comment