Tuesday, 24 September 2019

ICC WORLD CUP-WINNING CAPTAIN EOIN MORGAN AND INDIA SUPERSTAR ZAHEER KHAN ON HAND AT STAR-STUDDED LAUNCH CEREMONY IN MUMBAI

Photo Caption:  L-R World Cup winning England Captain Eoin Morgan, Chairman Abu Dhabi T10 League Shaji Ul Mulk, Indian Cricketer Zaheer Khan, CEO Abu Dhabi Sports Matthew Boucher and Team Owner Northern Warriors Mohomed Morani.
अबुधाबी टी10 आणि सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया जागतिक मंचावर घेऊन येते आहेत क्रिकेटचा नवा रोमांच.
- सोनी सिक्स आणि सोनी टेन 3 वाहिन्यांवरुन होणार टी10 लीगच्या सर्व 29 सामन्यांचे थेट प्रक्षेपण. सुमारे 700 मिलियन प्रेक्षक घेणार थरारक अनुभव.
- आयसीसी विश्वविजेता इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन आणि भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान यांच्या उपस्थितीत मुंबईत झाली अबुधाबी टी10 लीग स्पर्धेची घोषणा.

मुंबई 23 सप्टेंबर 2019: जगभरातील आपल्या करोडो प्रेक्षकांसाठी क्रिकेटचा नवा थरार समोर आणण्यासाठी सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियाने (एसपीएन) सलग तिसºया वर्षी अबुधाबी टी10 या रोमाचंक लीगसोबत अधिकृत प्रसारण भागीदारी करार केला आहे. 
या करारनुसार अबुधाबी टी10 लीगमधील सर्व 29 सामन्यांचे थेट प्रक्षेपण सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियाच्या सोनी सिक्स आणि सोनी टेन 3 या क्रीडा वाहिन्यांवरुन प्रसारित होईल. याद्वारे जगभरातील सुमारे 700 मिलियन क्रीडाप्रेमींना थरारक अशा अबुधाबी टी10 क्रिकेट लीगचा रोमांच अनुभवता येईल. त्याचबरोबर याव्यतिरिक्त रडठछकश् आणि जियो यांच्या माध्यमातून सुमारे 300 मिलियन क्रीडाप्रेमींना मोबाईलवरही या लीगचा थरार अनुभवण्याची संधी मिळेल.
याविषयी सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियाचे मुख्य महसूल अधिकारी वितरण आणि क्रीडा व्यवसाय विभागाचे  प्रमुख राजेश कौल यांनी सांगितले की, ‘भारतामध्ये क्रिकेटप्रेक्षकांचे मोठे वर्चस्व आहे आणि त्यामुळेच प्रेक्षकांच्या गरजा पूर्ण करणे हे आमचे मुख्य लक्ष्य आहे. टी10 लीग एक अत्यंत थरारक आणि एका जागेवर खिळवून ठेवणारा क्रिकेटचा नवा आणि वेगवान प्रकार आहे. 2017 साली झालेल्या पहिल्या सत्रापासून सोनी पिक्चर्स नेटवर्क या लीगसोबत असून तेव्हापासून या लीगचा आलेख उंचावला आहे. देशात सर्वाधिक पाहिला गेलेला टी10 हा खेळाचा नवा प्रकार आहे आणि त्यामुळेच यंदाच्या टी10 लीगची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. शिवाय यंदाच्या सत्रात क्रिकेटविश्वातील अनेक नामांकीत खेळाडू आपली चमक पाडण्यास सज्ज झाले आहेत.’
संयुक्त अरब अमिरातची राजधानी अबुधाबी येथे यंदाचे तिसरे सत्र पार पडणार असून यंदा या लीगने मोठे पाऊल उचलले असून स्पर्धेतील सर्वच सहभागी फ्रेंचाइजींनी जागतिक स्तर गाठला आहे. अबुधाबी येथे स्पर्धा आल्याने यंदा जगातील अनेक मोठ्या ब्रँड्सचे लक्ष वेधण्यात टी10 लीग यशस्वी ठरली. यामागे सर्वात मोठा हातभार लागला तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (आयसीसी). आयसीसीने या लीगला मान्यता दिल्याने जगभरातील कॉर्पोरेट्स समूह या लीगकडे आकर्षित झाले. टी10 क्रीडा व्यवस्थापनचे प्रमुख शाजी उल मुल्क यांनी सांगितले की, ‘ही लीग क्रिकेटचे सर्वात वेगवान स्वरुप असून लहान मुलांना ही लीग खूप आवडेल याची मला खात्री आहे. हे एक फुटबॉल सामना पाहण्यासारखे आहे. सर्व थरार 90 मिनिटांत संपतो आणि शिवाय यामध्ये अनेक नाट्य आणि मनोरंजन आहे. जागतिक क्रिकेटमधील हे एक खूप मोठे पाऊल आहे. लीग जशी पुढे-पुढे जाईल, तशी आम्ही काळजी घेऊ की, एकही प्रेक्षक नाराज होणार नाही आणि त्याअनुशंगानेच आम्ही सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया आणि जिओ सोबत या लीगचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी करार केला.’
सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियाकडे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डसह जगातील 8 क्रिकेट बोर्डाचे प्रसारण हक्क असून नुकत्याच झालेल्या प्रतिष्ठेच्या अ‍ॅशेस मालिकेचे प्रसारण हक्कही सोनी पिक्चर्स नेटवर्ककडे होते. सोमवारी मुंबईत टी10 लीगसह करण्यात आलेल्या कराराचे यश साजरे करण्यात आले आणि यावेळी विविध क्षेत्रातील नामांकीत व्यक्तींसह स्टार क्रिकेटपटूंचाही सहभाग होता. या लीगचे अधिकृत अ‍ॅम्बेसेडर म्हणून इंग्लंडचा विश्वविजेता कर्णधार इयॉन मॉर्गन आणि भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान यांची निवड करण्यात आली. 14 नोहेंबर 2019 ते 24 नोव्हेंबर 2019 दरम्यान टी10 लीगचा थरार अबुधाबी येथील झायेद क्रिकेट स्टेडियमवर रंगेल. 
इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन म्हणाला की, ‘क्रिकेटचा हा प्रकार अधिक वेगवान असल्याने जास्तीत जास्त प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. शिवाय आम्ही अशा शहरात खेळत आहोत जेथे मोठ्या गोष्टी करण्याचा आनंद मिळतो. मोठे खेळाडू, प्रेक्षकांची मोठी संख्या, मोठ्या प्रमाणातील थरार यामुळे ही लीग लोकप्रिय होत आहे. त्याचप्रमाणे अबुधाबी असे शहर आहे. जेथे प्रेक्षकांना मनोरंजन मिळते, त्यामुळे खेळाडूंनाही येथे खेळणे खूप आवडते. हे टी10 क्रिकेट लीग आहे.’
यंदाच्या टी10 लीगमध्ये आठ संघ जेतेपद पटकावण्यासाठी दहा दिवस एकमेकांविरुद्ध 29 सामन्यांमध्ये भिडतील. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये छाप पाडलेले क्रिकेट स्टार्स जसे की, शेन वॉट्सन, कॅमेरोन व्हाइट (दोघेही आॅस्टेÑलिया), डॅरेन सॅमी, आंद्रे रसेल, किएरॉन पोलार्ड आणि ड्वेन ब्रावो (सर्व वेस्ट इंडिज), अँजेलो मॅथ्यूज, लसिथ मलिंगा (दोघेही श्रीलंका), मोहम्मद शहझाद व राशिद खान (दोघेही अफगाणिस्तान) यांसारखे खेळाडू आपला जलवा दाखवतील. 
अबुधाबी क्रिकेटचे सीईओ मॅथ्यू बाऊचर म्हणाले, ‘या लीगमधील हा माध्यम करार जबरदस्त आहे. या लीगच्या थेट प्रक्षेपणामुळे भारतातील सुमारे 700 मिलियन प्रेक्षकांना घरबसल्या या लीगचा थरार अनुभवता येईल. अबुधाबीच्या सांस्कृतीक आणि पर्यटन विभागासह आम्हीही सोनी पिक्चर्स नेटवर्कसोबत झालेल्या कराराने उत्साहित आहोत. यामुळे येथील पर्यटन विभागालाही मोठी मदत होईल.’ 
माजी वेगवान गोलंदाज झहीर खान म्हणाला, ‘क्रिकेटमधील काही सर्वोत्तम क्षणांमुळे अबुधाबी टी10 क्रिकेट मोठे यश मिळवेल. जास्तीज जास्त प्रेक्षक या लीगचा टिव्ही, मोबाईलद्वारे थेट प्रक्षेपणाचा आनंद घेणार असल्याने ही लीग आणखी मोठी होईल. यामुळे जागतिक स्तरावर क्रिकेटचा प्रसार होण्यास मदत मिळेल.’ 
या लीगच्या पहिल्या सत्रात केरळा नाइट संघाने विजेतेपद पटकावले होते, तर नॉर्दन वॉरियर्स संघाने दुसºया सत्राचे जेतेपद उंचावले होते. पण यंदा अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी होत असल्याने लीगची चुरस वाढली असून यंदा कोण बाजी मारणार याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागली आहे.
अबुधाबी टी10 लीग विषयी :
अमिरात क्रिकेट बोर्डच्या टी10 क्रीडा व्यवस्थापनद्वारे सुरु करण्यात आलेली अबुधबी टी10 क्रिकेट लीग ही एक व्यावसायिक लीग आहे. या लीगला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) मान्यताही आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संस्थेची मान्यता मिळालेली ही पहिलीच टी10 क्रिकेट लीग आहे. 
या लीगमध्ये प्रत्येकी 10 षटकांचा सामना खेळविला जातो. दोन्ही डाव 45 मिानिटे याप्रमाणे सामना 90 मिनिट रंगतो. 10 दिवस रंगणाºया या स्पर्धेत राऊड रॉबिन पद्धतीने सामने खेळविण्यात येतील. यामध्ये उपांत्य आणि अंतिम सामन्यांचा समावेश आहे. 2017 साली झालेले लीगचे पहिले सत्र 14-17 डिसेंबरदरम्यान शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडले होते. लीगच्या दुसºया सत्रात दोन नव्या संघांचा समावेश करुन या लीगचे स्वरुप वाढविण्यात आले होते. त्यानंतर या लीगमध्ये दहा दिवसांत एकूण 29 सामने खेळविण्यात आले.
सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया (एसपीएन) विषयी:
सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया (एसपीएन) जपानच्या सोनी कॉर्पोरेशनचे मालकी हक्क असलेली कंपनी आहे.  ‘एसपीएन’चे विविध मनोरंजन व क्रीडा वाहिन्या असून यामध्ये भारताची आघाडीची हिंदी मनोरंजन वाहिनी सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन (सेट आणि सेट एचडी), भारतातील आघाडीची हिंदी सिनेमा वाहिनी आणि स्पेशल इव्हेंट चॅनल मॅक्स , मॅक्स 2, मॅक्स एचडी, कौटुंबिक विनोदी मनोरंजन वाहिनी सब आणि सब एचडी यांचा समावेश आहे. याशिवाय, इंग्रजी सिनेमा वाहिनी पिक्स आणि पिक्स एचडी, इंग्लिश रिअ‍ॅलिटी वाहिनी एएक्सएन, एएक्सएन एचडी, सॉनी बीबीसी अर्थ, सोनी बीबीसी अर्थ एचडी, सोनी आथ, हिंदी संगीत वाहिनी मिक्स, खास लहान मुलांसाठी याय!, तसेच सोनी सिक्स, सोनी सिक्स एचडी, सोनी इएसपीएन, सोनी इएसपीएन एचडी, सोनी टेन 1,सोनी टेन 1 एचडी, सोनी टेन 2, सोनी टेन 2 एचडी, सोनी टेन 3, सोनी टेन 3 एचडी या क्रीडा वाहिन्यांसह मराठी वाहिनी सोनी मराठी या आघाडीच्या वाहिनांचाही समावेश आहे.  यासारख्या आणखी अनेक वाहिन्यांच्या माधमातून भारतातील सुमारे 700 मिलियन प्रेक्षकांपर्यंत सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियान विविध विषयांची माहिती घेऊन पोहचत आहे.
आपल्या विविध आणि कल्पक कार्याच्या जोरावर एसपीएनने अनेक पुरस्कारांवर छाप पाडली आहे. यामध्ये अप्रतिम कॉर्पोरेट वातावरणासाठी दिला जाणारा एआॅन बेस्ट एम्प्लॉअर्स इंडिया पुरस्काराचे नाव अघाडीने घ्यावे लागेल. याशिवाय एसपीएनने भारतातील आघाडीच्या दहा कंपन्यांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. गेल्या 24 वर्षांपासून सध्या सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिट्ड भारतीय बाजारपेठेत भक्कमपणे वाटचाल करत आहे. अधिक माहितीसाठी 
www.sonypicturesnetworks.com  या संकेतस्थळाला भेट द्यावी.

No comments:

Post a Comment