Saturday 18 July 2020

Zee Talkies - World Television Premier of Takatak

टकाटक मधील या बोल्ड गाण्याने तोडलेत सगळे रेकॉर्ड
२०१९ मध्ये रिलीज झालेल्या 'टकाटकया चित्रपटाने बॉक्सऑफिस गाजवलंप्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करून अनेक पुरस्कार देखील पटकावलेभन्नाट पोस्टर आणि अफलातून ट्रेलर यामुळे या चित्रपटाची सुरुवातीपासूनच चर्चा होतीया चित्रपटातील एका गाण्याची देखील चांगलीच चर्चा रंगली होतीटकाटक या चित्रपटात प्रेक्षकांना अभिजित आमकर आणि प्रणाली भालेराव यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं 'ये चंद्रालाहे रोमँटिक सॉंग पाहायला मिळाले होतेया गाण्यातील प्रणालीचा हॉट अंदाज आणि तिच्या मादक अदा यांनी प्रेक्षकांना घायाळ केलंश्रुती राणे हिने गायलेल्या या गाण्याला युट्युबवर  करोडच्या वर व्ह्यूज मिळाले आहेत.
मिलिंद कवडे दिग्दर्शित या चित्रपटात सेक्स कॉमेडी हा प्रकार हाताळण्यात आला आहेमराठीमध्ये अशा प्रकारच्या चित्रपटांची संख्या फारच कमी आहेत्यामुळे प्रेक्षकांची मनं जिंकत या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर चांगलीच कमाई केली होतीपुन्हा एकदा या भन्नाट चित्रपटाकडे सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी झी टॉकीज हि वाहिनी प्रेक्षकांसाठी २६ जुलै रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी  वाजता 'टकाटकया चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर सादर करणार आहेत्यामुळे आपला रविवार 'टकाटकबनवण्यासाठी पाहायला विसरू नका झी टॉकीज.

No comments:

Post a Comment