Saturday 18 July 2020

‘स्वामिनी’ मालिकेमध्ये मोठ्या रमेच्या पावलांनी उजलणार शनिवारवाडा ! मालिकेच्या चित्रीकरणास सुरुवात...

मुंबई १८ जुलै, २०२० : ...आणि अखेर तो क्षण आला... स्वामिनी मालिकेच्या चित्रीकरणाला आता सुरुवात झाली आहे मालिकेच्या चित्रीकरणा दरम्यान सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन करत आणि योग्य ती काळजी घेत मालिकेच्या सेटवर चित्रीकरणाला सुरुवात झाला. शूटिंगला सुरुवात होण्याआधी जवळपासचा परिसरमेकअप रूम्ससेटचे सॅनिटाईझेशन करण्यात आले. २१ जुलैपासून मालिकेचे नवे भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत...येत्या भागांमध्ये प्रेक्षकांसाठी एक खास सरप्राईझ असणार आहे... निरागसपणे वाड्यात बागडत, हसण्याने सार्‍यांना मोहात पाडात, आणि पेशवाई संस्कारात घडत आपल्या रमाबाई मोठ्या झाल्या आहेत... हीच बालपणाची शिकवण घेऊन रमाबाई मोठेपणाची वाट चालणार आहेत... मोठ्या रमेच्या पावलांनी आता शनिवारवाडा उजलणार... मोठ्या रमाबाईंची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे... प्रेक्षकांना हे लवकरच करणार असून नक्की बघा स्वामिनी मालिका २१ जुलैपासून सोम ते शनि रात्री ८.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.
                           रमा एका सामान्य घरात वाढलेली निरागस मुलगी जिच्या नशिबी पेशवीणबाई होण्याचे थोर भाग्य आले आता ती भावी काळात येणार्‍या जबाबदार्‍या कशी पार पडेल ? माधवराव आईच्या विरोधात जाऊन तिला कशी साथ देतील ? रमा - माधव यांची नावे सुवर्णाक्षरांनी इतिहासाच्या पानावर कोरली गेली. माधवरावांचे रमावर असलेले अपार प्रेमरमाबाईंनी केलेला त्याग याला पेशवाई साक्ष आहे... हे सगळे कसे घडले ? रमा – माधव यांचा हा प्रवास कसा होता ? त्यांना कोणाची साथ लाभली ?  हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.
                 गृह कलह, घरातील राजकारण हे होत असतानाच रमाबाईंनी पेशवाईचा भार कसा सांभाळला या नव्या अध्यायाचे तुम्ही देखील साक्षी व्हा !  नक्की बघा स्वामिनी मालिका २१ जुलैपासून सोम ते शनि रात्री ८.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.

No comments:

Post a Comment