Wednesday, 1 July 2020

Zee Talkies

आषाढी एकादशीला झी टॉकीजवरून कीर्तनकारांशी साधा लाईव्ह संवाद

आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहतेपंढरपूरात दाखल झालेल्या भक्तांची मांदियाळीचंद्रभागेचा काठप्रदर्शिणा मार्गदर्शन बारीत भाबड्या भक्तांची आसपण सध्याच्या काळात लॉकडाऊनमुळे भक्तजनांना पंढरीची वारी करणं शक्य नसल्यामुळे झी टॉकीज वाहिनी त्यांच्यासाठी हा उत्सवच घरी घेऊन येणार आहेझी टॉकीज "बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठलएक सांगीतिक नजराणा वाहिनीवर रात्री .३० वाजता सादर करणार आहेपण त्याचसोबत आषाढी एकादशीची सकाळ प्रेक्षकांसाठी मंगलमय बनवण्यासाठी झी टॉकीजच्या फेसबुक पेजवर १० नामवंत कीर्तनकार लाईव्ह येणार आहेया कठीण काळात  पांडुरंगाशी एकरूप होतसकारात्मक राहण्याची प्रेरणा आणि आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवण्याची एक अनोखी  संधी "झी टॉकीज"  प्रेक्षकांना देते आहे
पहिल्यांदाच महाराष्ट्रातील १० सुप्रसिद्ध कीर्तनकार अशा प्रकारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेतयामध्ये ..भगवती महाराज सातारकर..पुरषोत्तम दादा महाराज पाटील..जगन्नाथ महाराज पाटील..जलाल महाराज सय्यद..तुकाराम महाराज मुडे..शंकर महाराज शेवाळे..प्रशांत महाराज ताकोते..चारुदत्त महाराज आफळे..डॉसुदाम महाराज पानेगावकर..समाधान महाराज शर्मा या कीर्तनकारांचा समावेश असणार आहे.  गायिका कार्तिकी गायकवाड आणि अभिनेत्री दीप्ती भागवत देखील फेसबुक पेजद्वारे लाईव्ह प्रेक्षकांच्या भेटीस येतीलसकाळी  वाजल्यापासून सलग  तास हे कीर्तनकार हरी नामाचा गाजरश्रद्धासकारात्मकतासमानतानातीशिक्षणप्रगतीसुखी संसाराचे सूत्रआरोग्यमनःशांती अशा वेगवेगळ्या विषयांवर फेसबुकद्वारे प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेतत्यामुळे आषाढी एकादशीचा उत्सव साजरा करण्यासाठी यंदा पंढरीच्या वारीला नाही तर झी टॉकीजच्या फेसबुक पेजला भेट द्या आणि घर बसल्या भक्तिरसामध्ये तल्लीन व्हा.

No comments:

Post a Comment