Tuesday, 13 October 2020

Zee Yuva - Tuza Maza Jamtay

 अपूर्वाने ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर

अपूर्वा नेमळेकरच्या टेलिव्हिजनवरील पुनरागमनामुळे तिच्या चाहत्यांना सुखद धक्काच मिळाला. लवकरच अपूर्वा ही झी युवा वरील तुझं माझं जमतंय या आगामी मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो देखील रिलीज झाला आणि अपूर्वाच्या पम्मी या नव्या व्यक्तिरेखेची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली. पम्मीला पाहून प्रेक्षक शेवंताला विसरून जातील आणि पम्मीच्या प्रेमात पडतील असं मत अपूर्वाने व्यक्त केलं होतं. सोशल मीडियावर देखील प्रेक्षकांनी या प्रोमोला उदंड प्रतिसाद दिला. पण काही नेटिझन्सनी अपूर्वाला या प्रोमोवरून ट्रोल करण्याचा प्रयत्न केला तेव्हा अपूर्वाने शांत न बसता त्या ट्रॉलर्सना सडेतोड उत्तर दिलं. 
प्रोमो पाहून एका नेटीझनने तुमचा लुक पाहता सगळे सिरियलवाले तुम्हाला बाहेरवालीचाच रोल देतात का? अशी कमेंट केली. त्यावर अपूर्वाने, "या सिरियलचा एकही एपिसोड टेलिकास्ट पण नाही झाला, तुम्ही आधीच ठरवून टाकलंत?" असं म्हणत त्या ट्रोलरची बोलती बंद करून टाकली. तसंच त्या ट्रोलरच्या सोशल मीडियावरील यूजरनेमवर निशाणा साधत अपूर्वा म्हणाली कि, "आणि मुळात कसंय, इनोसंट बॉय नाव ठेवून तुम्ही पण इनोसंट होत नाही ना." अपूर्वाच्या या बिनधास्त आणि निर्भीड स्वभावाच्याच चाहते प्रेमात आहेत. आता अपूर्वाची नवीन व्यक्तिरेखा पम्मीदेखील अशीच बिनधास्त आणि निर्भीड असणार आहे का हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

No comments:

Post a Comment