मुंबई १2 मे, २०१९ : रणवीर सिंगने गली बॉयच्या चित्रपटाच्या माध्यमातून धम्माकेदार रॅप सादर केल्यानंतर आता महेश मांजरेकर बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत रॅपचीक रॅप सॉंग. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सीझनसाठी महेश मांजरेकर यांनी नुकतच एक अतिशय stylized रॅप सॉंग शूट केले जे त्याने स्वतः गायले आहे. महेश मांजरेकरांचा डॅपर लुक आणि विंटेज बीटल रेट्रो गाडीवर बसून त्यांची या रॅप सॉंगमधली एन्ट्री एकदम कडक आहे. या कार्यक्रमाचे अनेक प्रोमोज महेश मांजरेकरांनी शूट केले असून प्रत्येक प्रोमोमध्ये त्यांचा वेगळा अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळतो आहे. महेश मांजरेकरांच्या या वेगवेगळ्या लुक्समुळे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कोणते सेलेब्रिटी जाणार याबद्दल प्रेक्षकांनी बरेच तर्क देखील लावण्यास सुरुवात केली आहे.
महेश मांजरेकर या गाण्यामध्ये चार वेगवेगळ्या डॅपर लुक्समध्ये दिसणार आहेत. या गाण्याच्या चित्रिकरणासाठी सहा वेगळ्या प्रकारचे सेट तयार करण्यात आले आहेत. या गाण्याची झलक बघण्यासाठी बघत रहा कलर्स मराठी.
No comments:
Post a Comment