Thursday, 31 October 2019

युवा सिंगर एक नंबर मध्ये कोण दिसणार अंतिम पाच ?

अल्पावधीतच लोकप्रिय झालेला 'युवा सिंगर एक नंबर' हा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. 'झी युवा' वाहिनीवरील कथाबाह्य कार्यक्रमांचा अल्पविराम या दर्जेदार कार्यक्रमाच्या माध्यमातून संपला आहे. उत्कृष्ट गायकांचा सहभाग असलेल्या स्पर्धेतून प्रेक्षकांचे खूप मनोरंजन झाले आहे. स्पर्धकांची काव्यप्रतिभा व गुणवत्ता पाहून सगळेच भारावून गेले आहेत.
अंतिम टप्प्यात पोचलेल्या या स्पर्धेची चुरस आता खूपच वाढली आहे. पाच जणांमध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रत्येक स्पर्धक आपले सर्वोत्तम सादरीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. स्पर्धकांमध्ये सगळ्यात लहान असलेले, ओंकार आणि राधिका सुद्धा सर्वांनाच 'टफ फाईट' देत आहेत. मूर्ती लहान पण कीर्ती महान असलेले हे स्पर्धक परीक्षक व प्रेक्षकांचे खूप लाडके आहेत. जगदीश चव्हाण व चेतन लोखंडे यांच्या गाण्यातील वैविध्य हा नेहमीच चर्चेचा विषय ठरलेला आहे. आपल्या आवाजाने त्यांनी सुद्धा सर्वांची मने जिंकली आहेत. एम. एच. फोक या गटाने लोकसंगीताच्या साहाय्याने प्रेक्षकवर्गावर जादू केलेली आहे. दर्शन-दुर्वांकुर आणि पूजा-पल्लवी या जोड्या सुद्धा सगळ्यांवर छाप पाडण्यात अनेकवेळा यशस्वी झाल्या आहेत. चित्रपट सृष्टीत पार्श्वसंगीतासाठी आवश्यक असणारा आवाजाचा दर्जा असणारे अनिमेश ठाकूर आणि वैष्णवी भालेराव हेदेखील या स्पर्धेत कुठेही मागे नाहीत. सर्व स्पर्धकांमध्ये 'कांटे की टक्कर' सुरू आहे. अंतिम पाच जणांमध्ये स्थान मिळवण्यासाठी आपला सर्वोत्तम परफॉर्मन्स देण्यासाठी सर्व स्पर्धक मेहनत घेत आहेत. या दमदार स्पर्धकांमधून सर्वोत्तम पाच निवडण्यासाठी परीक्षकांना सुद्धा कसरत करावी लागणार आहे.

ही कठीण परीक्षा पार पाडत, 'अंतिम फेरीत कोण स्थान मिळवणार?' हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका, 'युवा सिंगर एक नंबर', बुधवारी आणि गुरुवारी रात्री ९.३० वाजता, फक्त आपल्या लाडक्या 'झी युवा' वाहिनीवर!!!

No comments:

Post a comment