Thursday 23 July 2020

बोल्ड विषय असल्यामुळे चित्रपट रिलीज व्हायच्याआधी नेगेटिव्ह कमेंट्स येत होत्या - प्रणाली भालेराव

२०१९ मधल्या बॉक्सऑफिसवर कल्ला केलेल्या टकाटक या सिनेमातून अभिनेत्री प्रणाली भालेराव हिने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आणि सगळ्यांचं लक्ष देखील वेधून घेतलंया चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर झी टॉकीजवर २६ जुलै रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी  वाजता होणार आहेया निमित्ताने प्रणाली सोबत साधलेला हा खास संवाद
  1. या सिनेमाने बॉक्स ऑफिस वर चांगली कमाई केली आणि अनेक पुरस्कारही मिळवलेहे आनंदी क्षण तुम्ही कसे सेलीब्रेट केले?
  • सिनेमा जेव्हा प्रदर्शित झालापहिल्या दिवसापासूनच सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत होतासगळे थिएटर हाऊसफुल होतेप्रेक्षक सिनेमाला एवढा प्रतिसाद देतील असं वाटलं नाहीकारण सिनेमा प्रदर्शित होण्याआधीबोल्ड विषय असल्यामुळे नेगेटिव्ह कमेंट्स येत होत्यापण आम्ही सगळे खूप सकारात्मक होतोआम्ही सिनेमा मध्ये काय दाखवत आहोत याची पूर्ण जाणीव होतीसिनेमा प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांच्या कमेंट्समध्ये आम्हाला बराच फरक जाणवलाप्रेक्षक आमचं भरभरून कौतुक करत होतेआपल्या कुटुंबासोबत सिनेमा बघायला येत होतेप्रेक्षकांकडून मिळालेला प्रतिसाद हा आमच्यासाठी एक पुरस्कारच होतामहिनाभर सिनेमा हाऊसफुल झाल्यावर आम्ही जोरदार सेलिब्रेशन केलं
  1. तुझ्या सहकलाकारासोबत तुझे अनेक बोल्ड सीन्स होतेया बद्दल तुला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळाला?
  • मराठी सिनेसृष्टीमध्ये सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होताकारण एवढे बोल्ड सीन्स असलेलं गाणं  पहिल्यांदाच एका मराठी सिनेमा मध्ये दाखवण्यात आलं होतश्रुती राणे हिने हे गाणं फार सुंदर गायलेलं आहे१७ मिलिअन लोकांनी  हे गाणं बघितलं आहेबोल्ड सीन्स असल्यामुळे माझ्याही मनात थोडी भीती होतीपण गाणं प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे माझी भीती पळून गेलीअनपेक्षित प्रतिसाद प्रेक्षकांकडून मिळालाभरपूर लोकांनी मला फोनमेसेज करून गाणं छान असल्याचं कळवलं
  1. झी टॉकीज २६ जुलै रोजी टकाटक  सिनेमाचा वर्ल्ड टेलीव्हिजन प्रीमियर करणार आहेया बद्दल तू प्रेक्षकांना काय सांगशील आणि तु तुझा  दिवस कसा घालवणार आहेस?
  • हा सिनेमा पहिल्यांदाच टेलिव्हिजन प्रेक्षकांच्या भेटीस येत असल्यामुळे मी फारच उत्साही आहेया सिनेमाला प्रेक्षकांनी जसा प्रतिसाद थिएटर मध्ये दिला तसाच प्रतिसाद प्रेक्षक झी टॉकीजवर होणाऱ्या टकाटकच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरला देतीलयाची मला खात्री आहेमी लोकांना एवढच सांगीन कि ज्यांनी हा सिनेमा अजून बघितला नाहीये त्यांच्यासाठी ही एक सोनेरी संधी आहेया सिनेमामुळे तुमचं लॉकडाउन नक्कीच टकाटक जाईल याची मला खात्री आहेमी गावी असल्यामुले मी सगळ्या गावकऱ्यांना घरी बोलावून हा सिनेमा दाखवणार आहे.
  1. सगळं जग थांबलेलं आहेया लॉकडाउनमधील तुझी एखादी टकाटक आठवण आहे का
  • या संकटामुळे आपण सर्वजण घाबरलेले आहोतएकमेकांची काळजी घेत आहोतटकाटक सिनेमामुळे मला कायम सकारात्मक विचार करण्याची प्रेरणा मिळत राहतेयामुळे माझं लॉकडाउनसुद्धा टकाटक गेलं आहे.  टकाटक सिनेमामुळे माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली आहेटकाटकचा प्रवास अजूनही सुरूच आहेमी दिलेल्या प्रत्येक मुलाखतीत टकाटकचा उल्लेख होतोचया सिनेमाचं मला एक भाग होता आलं हे खरचं माझं भाग्य आहेसिनेमाची गाणीट्रेलर अजूनही प्रेक्षक मनापासून ऐकतातबघतातअशा अनेक बातम्या माझ्या पर्यंत पोहोचत असल्यामुळे माझ्यामध्ये सकारात्मकता निर्माण होते.
  1. सिनेमाच्या पडद्या मागील काही आठवणी आहेत का?
  • जेव्हा आम्ही मुंबई मध्ये शेवटचा सीन शूट करत होतो तेव्हा एका सीन मध्ये मी पूर्ण झोपून होतेमाझ्या हातांना लागलेलं आहे असं दाखवायचं असल्यामुळे मला खाता येत नव्हतंत्यामुळे भारत गणेशपुरे दादांनी मला त्यांच्या हातांनी भरवलं होतंहि माझ्या साठी खूप छान आठवण आहे.

No comments:

Post a Comment