Thursday, 16 May 2019

शिवा - सिद्धी ज्योतीबाला काय घालणार साकडं ?

मुंबई १६ मे२०१९ : प्रत्येक मुलीच्या आयुष्यात लग्न ही खूप महत्वाची घटना असते... कारण यानंतर तिचे संपूर्ण आयुष्यचं बदलून जाते. ती स्वत:च घर सोडून दुसऱ्या घरी जाते...नवे घर, नवीन नाती, नवीन मंडळीनव्या रिती – भाती सगळच नवीन असतं... प्रत्येक नात्याचा पाया प्रेम आणि विश्वास असतो आणि नवरा - बायकोच्या नात्यामध्ये हेच अत्यंत महत्वाचे असते. याच्या अगदी विरोधात आहे सिद्धी आणि शिवाचं नातं... ज्यामध्ये लग्न होण्याआधीपासून फक्त तिरस्कारद्वेष आहे... आत्याबाईंनी या दोघांचं लग्न त्यांच्या स्वार्थापोटी लावून दिलं खरं पण या दोघांचं भविष्य काय आहे हा तिरस्कार त्यांच्या नात्याला कुठे घेऊन जाईल या गोष्टीशी दोघेही अनभिज्ञ आहेत. परंपरेनुसार नव्या नवरा-नवरीने लग्नानंतर एकदा जोड्याने जाऊन ज्योतिबाचे आशीर्वाद घ्यायचे असतात. आता शिवाच्या घरचे त्यांना ज्योतिबाच्या दर्शनाला घेऊन जाणार आहेत. हा विधी एका नव्या नात्याची सुरुवात करून देणारा क्षण ठरणार आहे हे नक्की !
शिवा आणि सिद्धीच्या लग्नात बरेच विघ्न आले आणि दोघांच्या मनाविरुध्द हे लग्न झाले... दोघांनाही या लग्न बंधनामधून सुटका हवी आहे... हे दोघेही ज्योतिबाच्या दर्शनास जायला तयार झाले आहेत पण, ह्या प्रथेनुसार नवऱ्याने बायकोला उचलून पायऱ्या चढायच्या असतात... आता दोघांनाही हा विधी करण कठीण जाणार आहे... परंतु पार पाडण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय या दोघांकडे नाहीये...या सगळ्यामध्ये शिवा आणि सिद्धी ज्योतीबाला काय साकडं घालतील मालिकेमध्ये पुढे काय होईल ? कसा असेल शिवा – सिद्धीचा लग्नानंतरचा प्रवास ? हे बघणे रंजक असणार आहेतेंव्हा नक्की बघा जीव झाला येडापिसा मालिकेचा विशेष भाग या आठवड्यामध्ये रात्री ८ वा. आपल्या कलर्स मराठीवर.

No comments:

Post a Comment