Saturday, 25 May 2019

त्रिलोकाच्या संसाराचे सारथी “श्री लक्ष्मीनारायण” अद्भुत महागाथा कलर्स मराठीवर २७ मे पासून सोम ते शनि संध्या. ७.०० वा.

मुंबई २६ मे२०१९ : जिचा वर्ण सोन्यासारखा आहे, जी स्वत: आदिशक्ती आहेजिच्या असण्यानेच सगळं शुभं होतं, जी सुख, ऐश्वर्यधन यांचं प्रतीक आहे अशा श्री लक्ष्मीच्या प्राप्तीची आस आदी अनादी काळापासून मनुष्यालाच नाही तर देव – दानव, सूर – असूर यांना आहे. परंतु लक्ष्मी विना सृष्टीचे पालनहार नारायण मात्र अपूर्ण आहेत आणि ते एकत्र आले तर सृष्टीवर सुख नांदणार आहे, अशाच “श्री लक्ष्मी – नारायण” यांची अद्भुत महागाथा पहिल्यांदाच कलर्स मराठी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. मालिकेच्या संपूर्ण टीमने भारतीय पुराण, संस्कृती, वेदपरंपरा याचा सखोल अभ्यास आणि संशोधन करून ही कलाकृती प्रेक्षकांसमोर आणली आहे. लक्ष्मीची उत्पत्ती, लक्ष्मी नारायणाची भार्या कशी बनली, या सगळ्यामध्ये शिव आणि ब्रम्ह यांचे काय योगदान आहेअशा विविध टप्प्यांवरून मालिकेचे कथासूत्र फुलत जाणार आहे. भव्यदिव्य सेटसुरस कथादमदार अभिनययांनी नटलेल्या “श्री लक्ष्मी नारायण” या मालिकेचे क्रियेटीव्ह डायरेक्टर संतोष अयाचित असून निर्मिती साजरी क्रिएटीव्हज यांनी केली आहे... “श्री लक्ष्मीनारायण” २७ मे पासून सोम ते शनि संध्या. ७.०० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर दाखल होत आहे.
“श्री लक्ष्मीनारायण” मालिकेमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पौराणिक काळ प्रेक्षकांसमोर उभा करणे. पौराणिक कथेला साजेसा सेटसंवादकलाकारांच्या वेशभूषा इत्यादीद्वारे त्या काळाचे दर्शन करून देणं हे मोठं आव्हान असतं. कारण या गोष्टी थेट वेद पुराणमध्ये उल्लेख केल्या गेलेल्या देवी देवतांच्या वर्णनाशी जोडल्या जातात. आणि म्हणूनच मालिकेमध्ये अत्यंत बारकाईने अनेक गोष्टींचा विचार करण्यात आला आहे.
मालिकेबद्दल बोलताना व्यवसाय प्रमुख - मराठी मनोरंजनवायाकॉम१८ - निखिल साने म्हणाले, गेल्या वर्षभरापासून वेगवगेळ्या प्रकारचे कार्यक्रम प्रेक्षकांना देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. मग त्यात बिग बॉससूर नवा ध्यास नवा असे रिऍलिटी शोज असो वा बाळूमामाच्या नावानं चांगभलं, सुखाच्या सरींनी हे मन बावरेजीव झाला येडापिसा या मालिका असो... हीच विचार प्रक्रिया पुढे नेताना “श्री लक्ष्मीनारायण” यांची एक अलौकिक कथा पहिल्यांदाच भारतीय टेलिव्हिजवर सांगण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. याचबरोबर विशेष म्हणजे मराठी टेलिव्हिजनवरील आतापर्यंतचे नेत्रदीपक असे सेटस, नाविन्यपूर्ण आणि आकर्षक कॉस्ट्यूम्सअत्यंत उच्च दर्जाचे VFX प्रेक्षकांना अभूतपूर्व अनुभव देतील यात शंका नाही”.
मालिकेचे क्रियेटीव्ह डायरेक्टर संतोष अयाचित म्हणाले, “लक्ष्मी नारायण ही महाराष्ट्रासाठी केवळ दैवत नाहीत तर तो आदर्श जोडप्यासाठी वाक्प्रचार आहे. जी सर्वांना हवी आहे आणि जी आल्यानंतर अलक्ष्मीच्या रुपात भीती, चिंता घेऊन येते त्या लक्ष्मी नारायणाची गोष्ट ही संपूर्ण कुटुंबाला आवडेल ही सदिच्छा आहे... आपल्याकडे जे प्राचीन साहित्य आहे त्यातील गोष्ट सांगण्याची पद्धत ही अत्यंत वेगळीपरिणामकारक आणि सर्व समावेशक आहे. त्या साहित्याची शैली टेलिव्हिजन माध्यमासाठी अत्यंत पूरक आहे. ह्या साहित्यात श्री लक्ष्मीवर एकसंध साहित्य उपलब्ध नाही. ते अनेकविध ग्रंथात विखुरलेले आहे. त्यात श्री लक्ष्मीवर आधारित भारतीय टेलिव्हिजनवर पूर्ण कथा अद्याप आलेली नाही आणि आज मराठी टेलिव्हिजनवर श्री लक्ष्मी नारायण या कथेची मागणी होती आणि कलर्स मराठीने हा निर्णय घेतला त्याचा आनंद आहे”.
अगदी पुराणापासून कलयुगापर्यंत माणूस लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी झगडत आहेती “लक्ष्मी” मात्र जिथे विष्णूचा वास असतो तिथेच निवास करते. अशा जगतजननी श्रीलक्ष्मी नारायणाची एकत्र येण्याची गोष्ट आणि अद्भूत महागाथा “श्री लक्ष्मीनारायण” नक्की बघा २७ मे पासून सोम ते शनि संध्या. ७.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
श्री लक्ष्मीनारायण
कलाकारांची यादी
श्री लक्ष्मी
अनुष्का सरकटे
श्री विष्णू
रोशन विचारे
नारद
सोहन नंदूर्डीकर
समुद्रदेव
रणजीत जोग
तिरंगीणी
जुई बर्वे










No comments:

Post a Comment