झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्स प्रस्तुत दिग्दर्शक रवी जाधवचा कडक आणि सुसाट एन्टरटेन्टमेन्ट फॉर्मुला म्हणजेच ‘रंम्पाट’. अश्या या तुफानी चित्रपटासोबत निर्माती स्वाती संजय पाटील यांच्या बहुचर्चित ‘बंदिशाळा’ या अॅक्शनपॅक्ड महिलाप्रधान चित्रपटाचा ट्रेलर जोडण्यात आला आहे. ‘श्री माऊली मोशन पिक्चर्स’ प्रस्तुत आणि ‘शांताई मोशन पिक्चर्स’ची पहिली निर्मिती असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर ‘झी स्टुडिओ’च्या चित्रपटासोबत जोडला जाणं ही अभिमानाची गोष्ट असल्याची भावना चित्रपटाच्या निर्मात्यांनी व्यक्त करीत या ट्रेलरद्वारे आमचा चित्रपट घराघरात पोहचत असल्याचे लेखक संजय कृष्णाजी पाटील म्हणाले.
महिला सुरक्षेचा प्रश्न आजही महाराष्ट्रात ऐरणीवर आहे. महिलांच्या सुरक्षेचं हे विदारक सत्य आणि इथली भयानक परिस्थिती दाखवित बंदिशाळाचा हा ट्रेलर प्रेक्षकांच्या तनामानाचा कब्जा घेतो. भोंग्याच्या आवाजानं भयभीत झालेल्या सुरक्षा रक्षकांची उडणारी तारांबळ आणि त्या भयंकर परिस्थितीच कुठलंच दडपण न घेता बिनधास्तपणे त्या दंगलीला भिडणारी पोलीस अधिकारी माधवी सावंत अर्थात मुक्ता बर्वे दिसते. ती त्या दंगलीत घुसून दंगलखोरांवर आपली जरब बसवते. तिचा उद्रेक होत असूनही संयमी अभिनयामुळे तिची एक वेगळीच व्यक्तिरेखा असल्याची चुणूक या दृश्यातून प्रेक्षकांना येते.
गुन्हेगारांचा कर्दनकाळ बनून बेधडकपणे करारी मुक्ता उसळलेल्या दंगलीत घुसून दंगलखोरांना आपला इंगा दाखवताना दिसते. तिचे ऍक्शन सीन प्रेक्षकांच्या अंगावर येतात. रुबाबदार पोलिसी वर्दीतल्या मुक्ताने गुन्हेगारीचा समुळ नायनाट करण्याचा विडा उचलला असल्याचे या ट्रेलरमध्ये दिसून येत आहे. तुरुंग अधिक्षिका माधवी सावंत ही सक्षम अधिकार्याची भुमिका तिने या चित्रपटात रंगवली असून यापूर्वी कधीही पाहिला नाही असा अवतार तिचा या चित्रपटात असल्याचे पहायला मिळत आहे. या भूमिकेतला मुक्ताचा दरारा खिळवून ठेवणारा आहे. हा ट्रेलर पाहून चित्रपटाच्या संपूर्ण जातकुळीचा अंदाज बांधता येतो. जोगवा, पांगिरा, बहात्तर मैल – एक प्रवास, दशक्रिया या आशयघन चित्रपटानंतर लेखक संजय कृष्णाजी पाटील यांचा हा चित्रपट येत आहे. त्यांच्या संघर्षमय संवादांची परिणामकता या ट्रेलरची रंजकता वाढवते. दिग्दर्शक मिलिंद लेले यांची दृश्यात्मक रचना आणि सिनेमटोग्राफर सुरेश देशमाने यांचे सफाईदार camera movement प्रेक्षकांचं लक्ष वेधण्यात यशस्वी झाले आहे. सोबत कलादिग्दर्शक नरेंद्र हळदणकरांच्या रचनात्मक कलादिग्दर्शनाने या ट्रेलरमध्ये भर घातली असून या आकर्षक ट्रेलरची संकल्पना व संयोजन warriors touch यांनी केला आहे.
पायल गणेश कदम, मंगेश रामचंद्र जगताप सहनिर्मित ‘बंदिशाळा’ या चित्रपटात मुक्ता बर्वे यांच्यासोबतच उमेश जगताप, शरद पोंक्षे, विक्रम गायकवाड,हेमंगी कवी, सविता प्रभुणे, आशा शेलार, प्रवीण तरडे, अनिल नगरकर, अश्विनी गिरी, अजय पुरकर, माधव अभ्यंकर, शिवराज वाळवेकर, आनंद आलकुंटे, अभिजीत झुंजारराव, आनंदा कार्येकर, प्रसन्न केतकर, वर्षा घाटपांडे, सोनाली मगर, प्रताप कळके, राहुल शिरसाट, पंकज चेंबूरकर, लक्ष्मीकांत धोंड, अनिल राबाडे, विश्वजित देशपांडे, अशोक केळकर, पुंडलिक पालवे, उमेश बोलके, बालकलाकार आर्या घारे, सई खेडेकर सोबत पाहुणी कलाकार कृतिका गायकवाड यांच्या विशेष भूमिका आहे.
हा टीझर पाहण्यासाठी आज दुपारी १२:३० नंतर केव्हाही youtube वर
No comments:
Post a Comment