झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. टीआरपीच्या यादीतही ही मालिका नेहमी अग्रस्थानी असल्याचं पाहायला मिळतं. यामालिकेतील सर्व कलाकार देखील प्रेक्षकांचे अगदी फेव्हरेट आहेत. हे सर्व कलाकार ऑफस्क्रीन देखील तितकीच धमाल करतात.
सगळ्या कलाकारांचे चित्रीकरणाचं वेळापत्रक एकाच दिवशी नसल्यामुळे बऱ्याच दिवसांनी हे सर्व कलाकार सेटवर एकत्र आले आणि त्यांनी एकत्र मिळून आंब्यांचा आस्वादघेतला. त्यांचा आंब्यांसोबतचा गोड फोटो सुबोध भावे आणि इतर कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केला. त्यांचा याच फोटोवर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिक्रिया देखीलदिल्या.

No comments:
Post a Comment