Friday 17 May 2019

“तो परत येतोय” ... नवं घर, नवे सदस्य घेऊन कलर्स मराठीवर ! बिग बॉस मराठी सिझन दुसरा २६ मे संध्या. ७ वा. आणि रोज रात्री ९.३० वा.

रीनचा प्रस्तुतकर्ते म्हणून सहभाग आणि विशेष प्रायोजक म्हणून पुराणिक आणि Helo App यांचादेखील सहभाग
मुंबई १८ मे, २०१९ : एक असं घर ज्याने तमाम प्रेक्षकांची मने जिंकून त्यांना आपलसं केलं, एक असं घर ज्याने भांडण-वाद विवाद बघितले, असं घर ज्याने मैत्री कशी निभवावी हे शिकवलंज्याने सदस्यांचे रडण – हसण पाहिलं, ज्या घराने सदस्यांचे मुखवटे काही दिवसांतच उतरवले आणि त्यांचा खरा चेहरा प्रेक्षकांसमोर आणलाअसं घर जे महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलं... आता ते घर परत येत आहे नवे आणि अतरंगी सदस्य घेऊन तुमचं मनोरंजन करायलातुमची मने पुन्हा जिंकायला... तुम्हांला नवा अनुभव मिळवून द्यायला...राजकारण्याची महत्वकांक्षा, लावणी नृत्यांगनेला तिची प्रतिष्ठा पुन्हा कमवण्याची संधीसेलिब्रिटी शेफ तसेच पुन्हा एकदा चित्रपटात प्रवेश करण्याची कलाकाराला मिळालेली सुवर्णसंधी अश्या विविधविलक्षण स्वभावांची व्यक्ती पुन्हा एकदा एकत्र येणार “त्या” घरात...कारण कलर्स मराठी पुन्हा एकदा घेऊन येत आहे प्रेक्षकांना खिळवून ठेवणारामराठी टेलिव्हीजनवरचा सगळ्यात उत्कंठावर्धक रिअॅलिटी शो म्हणजेच रीन प्रस्तुत बिग बॉस मराठी - सिझन दुसरा कार्यक्रमासाठी विशेष प्रायोजक म्हणून पुराणिक आणि Helo App यांचादेखील सहभाग. ... विविध क्षेत्रातील १५ कलाकार घेऊन बिग बॉस मराठी सिझन २ सज्ज आहे मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करायला. 
बिग बॉसच्या घरातील सदस्य आणि प्रेक्षक यांच्यामधील दुवा म्हणजे कार्यक्रमाचे सूत्रसंचालक महेश मांजरेकरमागच्या पर्वात आपल्या दमदार व्यक्तिमत्वाने ज्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली तेच महेश मांजरेकर याही पर्वात सुत्रसंचालकाची महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेतमागच्या पर्वात त्यांनी ज्या प्रकारे घरातील सदस्यांना कधी मित्र बनूनतर कधी गुरु बनूनतर कधी मार्गदर्शक बनून तर कधी घरातील एक मोठी व्यक्ती बनून मार्गदर्शन केलं प्रसंगी परखड मत व्यक्त करत त्यांचे कानही उपटले.. चुकलेल्यांना समज दिली,खोटेपणाचे मुखवटे उतरवण्याचं काम केलं हे सर्व काही आता याही पर्वात बघायला मिळणार आहेएक उत्तम अभिनेताएक कौशल्यपूर्ण दिग्दर्शक यामुळे महेश मांजरेकर प्रत्येक मराठी प्रेक्षकांना आपलेसे वाटतात आणि त्यांच्या याच स्वभावगुणांमुळे त्यांच्याबद्दल आदरयुक्त भिती सुद्धा वाटते त्यामुळे याहीवर्षी ते घरातील सदस्यांबरोबरच प्रेक्षकांवरही आपल्या दमदार सुत्रसंचालनाची छाप सोडतील हे निश्चितएंडेमॉल शाइन इंडिया निर्मित बिग बॉस मराठी सिझन 2 एका दिमाखदार सोहळ्याद्वारे २६ मे रोजी संध्या. ७.०० वा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यानंतरचे भाग सोम ते रवि रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर. बिग बॉसच्या घरातील सदस्यांची धम्माल मस्ती,एकमेकांबद्दल करत असलेले गॉसिप याबद्दल तरूण पिढी मध्ये खूपच उत्सुकता असते यावेळेसदेखील VOOT वर कार्यक्रमाचे मूळ भागअनदेखा आणि प्रक्षेपित न केलेले भाग प्रेक्षक कधीही बघू शकतात. 
बिग बॉस मराठी सारख्या संकल्पना प्रादेशिक भाषांमध्ये घेऊन येणे हे नेहेमीच फायदेशीर ठरते... कारण यांसारख्या कार्यक्रमांचे स्वरूपउत्तम कॉनटेंट वेगळ्याप्रकारचे इंटिग्रेशन करण्याची उत्तम संधी देतात आणि त्यामुळेच असे ब्रॅण्डस जाहिरातदारांच्या आवडत्या ब्रॅण्डसपैकी एक बनतात. कार्यक्रमामध्ये होणारे वाद विवाद आणि मत यांमुळे मागील वर्षी सगळ्या कार्यक्रमांपैकी बिग बॉस मराठी हा शो मराठी मनोरंजन क्षेत्रातील म्हणजेच फक्त टेलिव्हीजन प्रेक्षकांसाठी नव्हे तर डिजिटल माध्यमांवर देखील सगळ्यात जास्त चर्चेत असणारा कार्यक्रम ठरला तेसुध्दा हिंदी कार्यक्रमांच्या तुलनेत... रविश कुमार हेडरीजनल एंटरटेनमेंट, वायाकॉम१८ यांनी सांगितले...  
पुढे ते म्हणाले, “कलर्स मराठीने गेल्या आर्थिक वर्षात ४९% इतकी वाढ बघितली आहेज्यामध्ये बिग बॉस मराठीचा मोलाचा वाटा आहे. ही बाब लक्षात घेता आम्ही विविध प्रकारच्या संकल्पना असलेले कार्यक्रम प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत जसे बिग बॉस... ज्याद्वारे आम्हांला विविध भागांमधील प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यास मदत होईल.. पण हा प्रयत्न करत असताना देखील कलर्स मराठी आपल्या मातीशी जोडलेले राहील हे निश्चित”. 
निखिल साने व्यवसाय प्रमुख - मराठी मनोरंजनवायाकॉम१८ म्हणाले, “बिग बॉस हा हिंदी भाषे बरोबरच अनेक प्रादेशिक भाषांमध्ये देखील लोकप्रिय असलेला कार्यक्रम आहेअसे असूनही बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाला अभूतपूर्व यश मिळाले. जवळपास ८६ लाख प्रेक्षकांनी बिग बॉस मराठी पहिल्या पर्वाचा शेवटचा भाग पहिला तर ५३ लाख इतके वोट स्पर्धकांना मिळाले... यामुळेच हा कार्यक्रम मराठी टेलिव्हिजनवर सर्वात यशस्वी कार्यक्रम ठरला.
पुढे ते म्हणाले, “मला असं वाटत बिग बॉस व्यतिरिक्त असा कुठलाही अनस्क्रीपटेड रिअॅलिटी शो नाही जो स्पर्धकांमधील भावना खऱ्या अर्थाने प्रेक्षकांपर्यंत पोहचवू शकतो आणि या कार्यक्रमाचे हेच वैशिष्ट्य आहे जे बाहेरच्या जगातील वास्तविकतेशी साधर्म्य दाखवते. मागील पर्वापेक्षा यावर्षीच्या पर्वाला अधिक रंजक व्हावा याकरीता आम्ही कार्यक्रमामध्ये काही बदल केले आहेत जसे कठोर नियम, आव्हानात्मक टास्क. या पर्वातील सगळ्यात मोठं आकर्षण असणार आहे “बिग बॉसचं घर” ज्याला अस्सलं मराठमोळ्या वाड्याचे स्वरूप देण्यात आले आहे.” 
बिग बॉसच्या कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी सर्वात मोठी उत्सुकता असते यात कोणते स्पर्धक सहभागी होतायत. संपूर्ण महाराष्ट्र आता या सिझनमध्ये कोणते कलाकार सदस्य म्हणून असतील याबाबत प्रेक्षक तर्क लावू लागले आहेत. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सिझनचे सूत्रसंचालन देखील महेश मांजरेकर करणार असून याबाबत बोलताना ते म्हणाले, “बिग बॉस मराठी हा मराठी टेलिव्हीजन वरील सगळ्यात महत्वाचा शो आहे असं मला वाटतं, कारण या कार्यक्रमामुळे आपल्याला माणसं खऱ्या आयुष्यात कशी आहेत ते बघायला मिळतं. घरामध्ये घडणाऱ्या घटनांमुळे चेहऱ्यावर असलेले मुखवटे काही क्षणांतचं पूर्णपणे उतरून जातात आणि यामुळेच हा शो प्रेक्षकांना खरा वाटतो. माझ्या चाहत्यांना कार्यक्रमाबद्दल खूपच उत्सुकता आहे, मला खात्री आहे पहिल्या सिझन प्रमाणे हा सिझन देखील त्यांच्या पसंतीस उतरेल.”
बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमध्ये विविध क्षेत्रातील १५ लोकप्रिय व्यक्तिमत्व घरामध्ये सदस्य म्हणून जाणार आहेत. याव्यतिरिक्त प्रेक्षकांसाठी एक मोठं सरप्राईझ असणार आहे आणि ते म्हणजे बिग बॉसचे घर जे तब्बल १४,००० चौरस फूट अश्या भव्य जागेमध्ये तयार करण्यात आले आहे. या घराला आलिशान अस्सलं मराठमोळ्या वाड्याचे स्वरूप देण्यात आले आहे, ज्याच्या मध्यभागी मोठे आंगण आणि मोठे ऍक्टिव्हिटी क्षेत्र असणार आहे. याव्यतिरिक्त, एक भव्य सेट तयार करण्यात आला आहे ज्याद्वारे महेश मांजरेकर स्पर्धकांशी संवाद साधतील. 
बिग बॉस मराठी सिझन दुसरा याबाबत बोलताना सीईओ, एंडेमॉल शाइन इंडिया अभिषेक रेगे – म्हणाले, आम्हाला अभिमान आहे, आम्ही बिग बॉस मराठीचा सिझन दुसरा घेऊन येत आहोत. ज्या कार्यक्रमाने मराठी टेलिव्हीजन इंडस्ट्रीमध्ये एक बेंचमार्क तयार केला. प्रेक्षकांनी या कार्यक्रमाच्या स्वरूपाला पसंती दर्शविली... या सिझनमध्ये देखील आम्ही प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन होईल हे नक्की. स्पर्धक, उत्तम सूत्रसंचालक, टास्क आणि नवीन ट्विस्ट जे प्रेक्षकांना संपूर्ण सिझन मनोरंजन देतील आणि खिळवून ठेवतील”. 
सर्वात लोकप्रिय आणि प्रेक्षक ज्याची मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत असा कार्यक्रम “बिग बॉस मराठी”चा सिझन दुसरा देखील पहिल्या पर्वा प्रमाणेच तितकाच धमाकेदार असेल ज्यात स्पर्धकांमधील वाद- विवाद, चुरसभांडण, प्रेम, मैत्री असे विविध पैलू बघायला मिळतील. वाहिनीने विस्तृत मार्केटिंग आणि डिजिटल योजना तयार केली आहे ज्याद्वारे प्रेक्षकांना शोबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल. हे १५ कलाकार त्यांच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच १०० दिवस एका अनोळखी जागी ७५ कॅमेरांच्या नजरकैदेत रहाणार आहेत. हा प्रवास त्यांना आनंददायी आणि अविस्मरणीय असेल इतकीच आम्ही आशा करतो ...
बिग बॉसची नजर तुमच्यावर देखील आहे तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन दुसरा आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि चुकून राहलंच तर विसीट कराwww.colorsmarathi.com ... तुम्हाला आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजवर देखील याचे अपडेट्स मिळू शकतात @Colorsmarathi and @BiggBossMarathiत्यासाठी हॅशटॅग #BiggBossMarathi2 | इंस्टाग्राम युसर्सना एक्सक्लूसिव्ह माहिती मिळू शकते @Colorsmarathiofficial यावर...
About COLORS Marathi
COLORS Marathi is a family entertainment channel that mirrors the cultural ethos and spirit of Maharashtra through a range of unique differentiated content created to redefine the family viewing experience. Pioneers of the Marathi General Entertainment Genre, COLORS Marathi has many firsts to its credit. The channel was the first to experiment with new homegrown non-fiction formats like Bigg Boss, Sur Nava Dhyas Nava, Gaurav Maharashtracha, and Crime Diary that has revolutionized the Marathi Television space. On the fiction front COLORS Marathi has had a glorious run with landmark shows like Ghadge & Suun, Sukhachya Sarini Hye Maan Baware, Balumamachya Navan Chang Bhala, Tu Majha Saangati and Majhe Mann Tujhe Jhale and many more thus establishing new standards of scale and grandeur in Marathi Television history.
About Viacom18
Viacom18 Media Pvt. Ltd. is one of India's fastest growing entertainment networks and a house of iconic brands that offers multi-platform, multi-generational and multicultural brand experiences. A joint venture of TV18, which owns 51%, and Viacom Inc., with a 49% stake, Viacom18 defines entertainment in India by touching the lives of people through its properties on air, online, on ground, in shop and through cinema.

No comments:

Post a Comment