Sunday, 26 May 2019

५६ व्या मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये ‘बंदिशाळा’चे दैदीप्यमान यश!


उत्कृष्ट चित्रपट क्रं २ सह ७ पुरस्कारांवर बंदिशाळाची मोहर!
मुक्ता बर्वे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराने सन्मानित!
पदार्पणातच सर्वोत्कृष्ट चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या 'शांताई मोशन पिक्चर्स'च्या 'बंदिशाळाया चित्रपटाने महाराष्ट्र राज्य शासनाच्या ५६ व्या मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्या' मध्ये सर्वाधिक पुरस्कार पटकावून बाजी मारली.  या चित्रपटाला 'सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण चित्रपट निर्मितीशांताई मोशन पिक्चर्स - निर्माती सौ. स्वाती संजय पाटीलसर्वोत्कृष्ट चित्रपट क्रमांक - २सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मुक्ता बर्वेसर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका प्रियांका बर्वेसर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत विजय गवंडेसर्वोत्कृष्ट गीत संजय पाटीलसर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शक नरेंद्र हळदणकर अश्या तब्बल ७ सर्वोत्कृष्ट पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. अत्यंत दिमाखदार व भव्य सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार वरळीच्या डोम ऑडीटोरिअममध्ये प्रदान करण्यात आले. सोनी मराठी वाहिनीवर हा पुरस्कार सोहळा प्रेक्षकांना लवकरच पहायला मिळणार आहे.
'जोगवा', 'पांगिरा', '७२ मैल एक प्रवासया गाजलेल्या दर्जेदार चित्रपटांचे लेखक प्रस्तुतकर्ते आणि 'दशक्रियाया चित्रपटाच्या पटकथा लेखनासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवलेले संजय कृष्णाजी पाटील यांनी बंदिशाळाचे कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन केले आहे. सौ. स्वाती संजय पाटील यांच्या शांताई मोशन पिक्चर्स’ या संस्थेची ही पहिली निर्मिती असून श्री माऊली मोशन्स पिक्चर्स ची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलिंद लेले यांनी केले आहे. एका सत्य घटनेवर बेतलेल्या या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच संजय कृष्णाजी पाटील यांनी कादंबरी बाहेरील विषयालाहात घेतला आहे.
बंदिशाळा हा एक सामाजिक विषयावरील महत्वाकांशी चित्रपट असून त्याला एका कारागृहाची पार्श्वभूमी लाभली आहे. एका कर्तव्यदक्ष महिला तुरुंग अधिकार्‍याची कथा या चित्रपटातून उलगडणार असून ही भूमिका आणि हा वेगळा विषय मुक्ता बर्वे या अभिनेत्रीने उत्तुंग शिखरावर पोहचविला आहे. तिने या चित्रपटात माधवी सावंत ही महिला तुरुंग अधिकारी जिवंत केली आहे. आजपर्यंतची सर्वाधिक आव्हानात्मक भूमिका तिला या निमित्ताने करायला मिळाली आहे.
मिलिंद लेले दिग्दर्शित बंदिशाळाची सहनिर्मिती पायल गणेश कदममंगेश रामचंद्र जगताप यांनी केली असून प्रख्यात सिनेमॅटोग्राफर सुरेश देशमाने यांच्या कॅमेऱ्यातून हा घटनाक्रम पहायला मिळणार आहे. संजय कृष्णाजी पाटील रचित चार गीतांना संगीतकार अमितराज यांनी स्वरबद्ध केले आहे. यामध्ये प्रार्थना,लावणीथीमसॉंग आणि लग्नगीत असा संगीतप्रकार असून प्रसिद्ध गायिका वैशाली सामंतप्रियांका बर्वेआरती केळकरआरोही म्हात्रे अश्या गायकांच्या आवाजाची जादू रसिकांना मोहून टाकत आहे. प्रसिद्ध कोरिओग्राफर विठ्ठल पाटील यांनी नृत्यरचना केली असून कार्यकारी निर्मितीची सूत्रे राम कोंडू कोंडीलकर यांनी सांभाळली आहेत. बंदिशाळातील चित्तथरारक साहसदृश्य प्रशांत नाईक यांनी दिग्दर्शित केली असून दिग्दर्शक मिलिंद लेलेंना  सुनील मांजरेकर यांनी प्रमुख सहाय्यक दिग्दर्शन केले आहे.
या चित्रपटात मुक्ता बर्वे यांच्यासोबतच विक्रम गायकवाडशरद पोंक्षेहेमांगी कवीसविता प्रभुणेआशा शेलारप्रवीण तरडेअश्विनी गिरीअजय पुरकर,माधव अभ्यंकरशिवराज वाळवेकरआनंद आलकुंटेअभिजीत झुंजाररावआनंदा कार्येकरप्रसन्न केतकरवर्षा घाटपांडेसोनाली मगरप्रताप कळके,राहुल शिरसाटपंकज चेंबूरकरलक्ष्मीकांत धोंडअनिल राबाडेउमेश बोलकेअनिल नगरकर आणि उमेश जगताप यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
या चित्रपटाची महाराष्ट्र राज्य सरकारच्यावतीने कान्ससाठी निवड करण्यात आली होती. कान्स मार्केटमधील जगप्रसिद्ध पलास सी’, ‘जे या भव्य चित्रपटगृहांमध्ये नुकतेच बंदिशाळाचे दोन शो महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून दाखविण्यात आले. जगभरातील दर्दींनी हा चित्रपट पाहिल्यानंतर भरभरून कौतुक केले. बंदिशाळामध्ये मुक्ता बर्वे यांची अत्यंत धाडसी भूमिका असून तिची ही भूमिका पहाण्यासाठी तिच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. तिला याच भूमिकेसाठी मिळालेल्या महाराष्ट्र शासनाच्या या पुरस्कारामुळे ही उत्सुकता शिगेला पोहचली असून येत्या २१ जूनला रसिकांना चित्रपटगृहात मुक्ताला या भूमिकेत पहाण्यासाठी थोडीशी कळ सोसावी लागणार आहे.

No comments:

Post a Comment