Wednesday, 9 October 2019

जीव झाला येडापिसा दसरा विशेष भाग !


A picture containing indoor, floor, wall, table

Description automatically generatedA group of people sitting at a table

Description automatically generatedA girl standing in a room

Description automatically generated
मुंबई ७ ऑक्टोबर, २०१९ विजयादशमी म्हणजेच आश्विन शुध्द दशमी हा दिवस दसरा म्हणून पाळला जातो.साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणारा दसरा सण उद्या सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. कलर्स मराठीवरील जीव झाला येडापिसा मालिकेमध्ये प्रत्येक सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो मग जन्माष्टमी असो, गणपती असो... आता लष्करे कुटुंबातील मंडळी दसरा देखील मोठ्या उत्साहात पार पडणार आहेत. सिद्धी, सोनी, काकी यांनी मिळून पूजेची आणि बाकीची तयारी केली आहे. तिघींनी मिळून सुंदर रांगोळी काढली आहे, घर सजवले आहे. महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी परस्परांना सोने म्हणून आपट्याची पाने देतात. या दिवशी सरस्वती पूजनआणि शस्त्रपूजन केले जाते. सिध्दी देखील ही पुजा सोनी, बंट्या – बाबल्या आणि काकीच्या मदतीने पार पडणार आहे. शिवा पक्षकार्य करत आहे हे कळल्यानंतर सिध्दी आणि शिवाचे नाते आता नाजुक वळणावर येऊन पोहचले आहे... शिवा आता कुठलीही गोष्ट करताना मी हे पक्ष कार्य म्हणूनच करत आहे असे सिद्धीला सांगून करतो... दसर्‍याच्या निमिताने शिवाने सिध्दीसाठी सोन्याची भेटवस्तु आणली पण सिध्दी त्याचा स्वीकार करण्यास साफ नकार देते... कारण शिवाचे हे वागणे खोटे आहे आणि त्याच्या मनामध्ये अशा कोणत्याच भावना नाही हे तिला कळून चुकले आहे... दसर्‍याच्या दिवशी रावण दहन केले जाते, सिध्दीच्या मते शिवाच तिच्या आयुष्यातला रावण आहे आणि तिला त्याच्या कडून कसलीही अपेक्षा नाही हे ती स्पष्ट करते...
सिध्दीला लष्करेच्या घरामध्ये यशवंत यांचा खूप मोठा आधार होता पण आता मात्र ते घरापासून दूर गेले आहेत, त्यामध्ये शिवा आणि सिध्दीमध्ये वाढत असलेले गैरसमज... या सगळ्यातून या दोघांचे नाते कुठल्या वळणावर येऊन पोहचेल ? ते एकमेकांना समजू शकतील ? दोघांमधील गैरसमज दूर होतील ? जाणून घेण्यासाठी बघा जीव झाला येडापिसा रात्री ८.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

1 comment:

  1. I have a presentation subsequent week, and I’m at the search for such info about "hair straightener pink".

    ReplyDelete