मुंबई, 23 ऑक्टोबर, 2019: ग्रँड मराठा फाऊंडेशन या महाराष्ट्रातील शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या गरजा भागविणाऱ्या गैर-सरकारी संस्थेने 22 ऑक्टोबर 2019 रोजी देणगी मोहिमेचे आयोजन करून पुरुष, स्त्रिया आणि मुलांसाठी मोठ्या प्रमाणात कपडे गोळा केले. या देणगी स्वरूपात मिळालेल्या वस्तूंमध्ये शालेय पुस्तके, खेळणी, चपला आणि कोरडा शिधा यांचा देखील समावेश आहे. ठाण्यातील माजिवाडामधील नवजीवन प्रथामिक विद्यामंदिरात या वस्तूंचे वाटप करण्यात आले. ही शाळा ठाण्यातील वंचित मुलांना शिक्षण देण्याचे काम करते. साधारणपणे 200 मुले आणि त्यांना आधार देणाऱ्या कुटुंबांना या उपक्रमाचा लाभ मिळणार आहे. ग्रँड मराठा फाऊंडेशनच्या विश्वस्त सौ. माधवी शेलाटकर जातीने या सोहळ्यासाठी उपस्थित राहिल्या आणि त्यांच्याच हस्ते कुटुंबांना या वस्तूंचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना ग्रँड मराठा फाऊंडेशनचे संस्थापक श्री. रोहित शेलाटकर म्हणाले, “वंचित वर्गाला लक्ष्य करून त्यांच्या रहाणीमानाचा स्तर उंचावता यावा यासाठी चांगल्या सुविधा आणि शिक्षण उपलब्ध करून देऊन त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ग्रँड मराठा फाऊंडेशन निरंतर वचनबद्ध आहे. शक्य तितक्या कुटुंबांना मदत करून आम्हाला त्यांची दिवाळी उजळविता आली, त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवता आले आणि त्यांना आनंद देता आला याचे आम्हाला समाधान आहे. चांगले आयुष्य जगता यावे म्हणून शेतकऱ्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे सक्षमीकरण करण्यासाठी आम्ही आमचे प्रयत्न असेच सुरू ठेवणार आहोत.
लोकांना जास्त प्रमाणात मदत करता यावी यासाठी जास्त संधी निर्माण करण्यासाठी नवे उपक्रम राबविण्याच्या बाबतीत ग्रँड मराठा फाऊंडेशन नेहमीच अग्रेसर आहे. कर्ज आणि गरिबीच्या भोवऱ्यात अडकलेल्या शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. वंचित मुलांना या दिवाळीत मदत करण्याचे संस्थेचे उद्दिष्ट होते. चांगले शिक्षण आणि स्वतःच्या आयुष्यात हास्य आणि मजा अनुभवत सणाचा आनंद घेण्यासाठी ही मुले या संसाधनांचा उपयोग करून स्वतःचीच मदत करू शकतील.”
ग्रँड मराठा फाउंडेशनविषयी:
ग्रँड मराठा फाऊंडेशनच्या वतीने शेतकऱ्यांना सर्वांगीण शैक्षणिक पाठबळ पुरवले जाते, त्यामध्ये आधुनिक तंत्राची योग्य किंमत समाविष्ट असून शेतकऱ्यांच्या पाठी लागलेले कर्ज व गरिबीचे दुष्टचक्र मोडीत काढून त्यांना चांगल्या आयुष्याची संधी उपलब्ध करून देण्यात येते. ग्रँड मराठा फाऊंडेशनच्या वतीने विशेष लक्ष हे विदर्भावर देण्यात आले असून शेतकऱ्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून आर्थिक साह्य देऊ करण्यात येते, त्याचप्रमाणे कृषी पट्ट्यात व ग्रामीण भागात शेतीपूरक क्रियाकलाप राबवून विधवा महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो. शाळांना संगणक दान करून त्यांनी ई-लर्निंगची ओळख करून दिली व त्याला प्रोत्साहन देत आहेत. शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांना कर्ज आणि गरिबीच्या या दुष्ट चक्रातून बाहेर काढून चांगले जीवनमान मिळावे हेच ग्रँड मराठा फाउंडेशनचे ध्येय आहे. हे फाऊंडेशन महाराष्ट्रातील अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर आणि नागपूर भागात शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांच्या सर्वांगीण विकासाकरिता प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांना आगामी काळासाठी तयार करण्याचे त्यांचे ध्येय आहे. त्यांना नियमित आयुष्यात सतावणाऱ्या समस्या कमी करून त्यांचे जीवन समृद्ध करायचे आहे.
No comments:
Post a Comment