निखिल दामले (नचिकेत,ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण | झी युवा )
आम्हा कलाकारांच्या दिवाळीची सुरुवात सुट्टी मागण्यापासून होते. यंदा मला सुट्टी मिळाली आहे. त्यामुळे मी पुण्याला माझ्या घरी जाणार आहे. दिवाळी हा माझा सर्वात आवडता सण आहे. नेहमी भेटू न शकणारी आप्तेष्ट मंडळी या निमित्ताने भेटतात. एखाद्या विशिष्ट वर्षातील दिवाळीची आठवण सांगणं कठीण आहे, कारण प्रत्येक दिवाळी माझ्यासाठी स्पेशलच असते. फराळाच्या बाबतीत म्हणाल, तर चकल्या पाडायला मला थोडं फार जमतं, पण इतर पदार्थांवर ताव मारणे, हेच मुख्य काम असतं. माझ्यासाठी दिवाळीचा आनंद हा सगळ्या मंडळींच्या गाठीभेटी आणि फराळ यावरच अवलंबून असतो. फटाके फोडणं मला अजिबातच आवडत नाही. फटाक्यांमुळे होणारं प्रदूषण, वयस्कर मंडळी, लहान मुलं आणि अगदी इतर सर्वांना सुद्धा धुरामुळे होणारा त्रास या कारणांमुळे मी फटाक्यांच्या विरोधात आहे. मी कधीही फटाके फोडले नाहीत व इतरांनी सुद्धा कमीत कमी फटाके फोडावेत असं मला वाटतं.
अभिजित श्वेतचंद्र (प्रताप, साजणा | झी युवा )
दिवसरात्र 'साजणा' मालिकेचे शूट सुरू आहे. या व्यस्त कार्यक्रमातून दिवाळीच्या निमित्ताने ४ दिवसांची सुट्टी मिळणार आहे. दिवाळीचे खूप प्लॅन्स केले आहेत. ते पूर्ण करायला मिळणार असल्याने, यंदा सुद्धा दिवाळीची खूप उत्सुकता आहे. दिवाळीच्या निमित्ताने मी दरवर्षी वृद्धाश्रमात जातो. यंदादेखील तिथे नक्कीच जाईन. यंदाची दिवाळी स्पेशल असण्याचं आणखी एक कारण म्हणजे, 'साजणा'च्या सेटवर, 'झी युवा'च्या कुटुंबासोबत आणि नंतर घरी, अशी तीनवेळा दिवाळी साजरी करण्याची संधी मला मिळाली आहे. घरच्यांसोबत दिवाळी साजरी करणार असल्याने, २-३ दिवस डाएट बाजूला ठेऊन, भरपूर फराळ करणार आहे. अर्थात, फक्त फराळावर ताव मारणे एवढंच काम नसतं. मला फराळातील अनेक पदार्थ करता येतात. लहानपणी आईला बऱ्याचवेळा मदत करायचो, पण आता शूटिंगमुळे ते शक्य होत नाही. तरीदेखील जमेल तशी आणि जमेल तेवढी मदत मी करतो.
फटाके फोडून दिवाळी साजरी करायला अनेकांना आवडते. पण, त्यामुळे होणारे दुष्परिणाम, इतरांना होणारा त्रास, अपघात या सगळ्या गोष्टींचा विचार करून फटाक्यांचा वापर करावा असं मला वाटतं. फटाके न फोडता, इतर सर्व गोष्टी आनंद घेऊन दिवाळी साजरी करणं शक्य असल्यास, सर्वांनी याचा विचार करायला हवा. उत्तमरीत्या आणि आनंदात दिवाळी साजरी करण्यासाठी, माझ्याकडून व 'झी युवा'च्या संपूर्ण टीमकडून तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा...!!
तितिक्षा तावडे (मनवा, तू अशी जावळी राहा | झी युवा )
मला चकली आवडते
दिवाळीचा सण म्हणजे कंदील, चहुबाजूला प्रकाश, पणत्या, रांगोळी सगळीकडे प्रसन्न वातावरण असते. या सगळ्यांमध्ये सगळ्यांचीच आवडती गोष्ट म्हणजे फराळ. फराळामध्ये मला चकली खूपच आवडते.
मला लहानपणापासून दिवाळीचा पहिला दिवस खूपच आवडतो. सर्वजण एकत्र येऊन फराळ करतात, फटाके उडवतात, नवीन कपडे, गप्पा-गोष्टी करतात, हे सगळंच मला खूप आवडतं. पण, आता विचाराल तर मला दिवाळीचा आदला दिवस खूप आवडतो, त्याचं कारण असं की, खूप खरेदी करायला मिळते घरच्यांसाठी, स्वत:साठी. घराची साफ-सफाई हे सगळं एक दिवस आधी होते, त्यामुळे मला आदला दिवस आता जास्त आवडतो
मी दिवाळी या सणाची खूप आतुरते ने वाट पाहते. स्वाराज्यरक्षक सं भाजी मालिकेच्या चित्रीकरणात मी खूपच व्यग्र आहे त्यामुळे अजू नतरी मी या सणाची काहीच तयारी क रू शकली नाहीये. दिवाळीचे २ दि वस आम्हाला शूटिंगमधून सुट्टी मि ळेल त्यावेळी मी माझ्या कुटुंबि यांसोबत हा सण साजरा करणार आहे. मी खूप शॉपिंग करणार आहे. दिवा ळी म्हंटल कि फराळ आला. यावेळी मी कारंजी आणि चकलीवर ताव मारणा र आहे. चकली हा माझा आवडता पदा र्थ आहे. दिवाळी आणि फटाके फो डणे हे समीकरणच आहे पण सध्याची पर्यावरणाची अवस्था बघता फटाके फोडू नका अशीच विनंती मी माझ्या चाहत्यांना करेन. तसंच या दिवा ळीला गरजू लोकांमध्ये आनंद पसरवा यचा प्रयत्न करूया आणि हि दिवा ळी सगळ्यांसाठी आनंददायी बनवूया .
तेजश्री प्रधान (शुभ्रा, अगंबाई सासूबाई - झी मराठी)
माझ्याप्रमाणेच माझ्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येक कलाकार, तंत् रज्ञ व सेटवरचे लहान-मोठे कामगा र या प्रत्येकाची ‘आपल्या घरची’ दिवाळी असते. मालिकांतून भूमि का करणारे आम्ही सगळे दररोज बा रा-चौदा तास एकत्र असतो, त्यातू न नवे भावबंध जुळतात, नाती तयार होतात, एक नवे घर वा कुटुंब आका राला येते असे म्हटले तरी चालेल , अशा कुटुंबाची मग सेटवर दिवा ळी साजरी करतो. हा एक नवा अनुभव असतो. यावर्षी ‘अगंबाई सासूबाई ’ या मालिकेच्या बाबतीत असेच हो ईल. चित्रीकरणातून थोडा वेळ का ढून मी माझ्या घरी जाऊन माझ्या आईबाबांसोबत देखील हा सण साजरा कारेन.
तेजस बर्वे (समर, मिसेस मुख्यमं त्री - झी मराठी)
यंदाची दिवाळी माझ्यासाठी खूप खा स आहे कारण मी मिसेस मुख्यमंत् री या मालिकेच्या निमित्ताने प् रेक्षकांचं मनोरंजन करतोय आणि या च मालिकेच्या चित्रीकरणात व्यस् त असल्यामुळे आम्हाला ३ दिवसां ची सुट्टी मिळणार आहे. ३ दिवसात मी कशी दिवाळी साजरी करणार आहे याचं प्लॅनिंग करतो आहे. मालि केच्या निमित्ताने घरापासून दूर असल्यामुळे मला खरेदीसाठी जास् त वेळ मिळणार नाही आहे, त्यामु ळे माझे कुटुंबीयच मला यावेळी स रप्राईज देणार आहेत आणि यासाठी मी खूप उत्सुक आहे. दिवाळी म्हं टल कि खाण्याची चंगळ असते. मला फराळातील सर्व गोडाचे पदार्थ आव डतात, त्यातल्या त्यात मला बे सनाचे लाडू खूपच आवडतात. माझी आ ई बेसनाचे लाडू उत्तम बनवते त् यामुळे मी त्यावर ताव मारणार आहे. लहानपणी फटाक्यांची भीती वाटत असल्यामुळे आणि मोठं झाल्यावर फटाक्यांमुळे पर्यावरणावर काय दु ष्परिणाम होतात हे कळायला लागल् यामुळे मी कधी फारसे फटाके फो डलेच नाहीत.
हार्दिक जोशी (राणा, तुझ्यात जी व रंगला - झी मराठी)
यंदा कोल्हापूरमध्ये सतत पाऊस अ सल्यामुळे तुझ्यात जीव रंगला या मालिकेत शूटिंग आम्ही पूर्ण कर ण्यासाठी दिवसरात्र चित्रीकरण क रत आहोत. यावेळी दिवाळीची 3 दि वस सुट्टी मिळणार आहे तेव्हा मी माझ्या घरी माझ्या परिवारासोबत हा सण साजरा करणार आहे. मी आईला घरी साफसफाईसाठी, फराळात चकल् या आणि शंकरपाळ्या करायला मदत क रायचो पण गेली 3 वर्ष मालिकेमु ळे मी दिवाळीच्या पहिल्याच दि वशी घरी जातो त्यामुळे ही मदत फा रशी आता करता येत नाही. माझ्या मते आपले सण जपण्याची जबाबदारी आपल्यावरच आहे. घरी मी दिवाळी ही पारंपरिक पद्धतीने साजरी करतो. पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठून उटणं लावून अंघोळ करणं, कारेट फोडण, मित्रपरिवाराला भेटणं त् यांच्या सोबत फराळाचा आस्वाद घे णं आशा प्रकारे मी दिवाळी साजरी करतो आणि आपण हा सण असाच पारं परिक पद्धतीने साजरा केला पाहि जे जेणेकरुन पुढील पिढीमध्ये दे खील हा सण सुट्टी म्हणून नाही त र एक सण म्हणून जीवंत राहील. तसं च फटाके फोडताना प्राण्यांची का ळजी घ्या कारण फटाक्यां
No comments:
Post a Comment