Tuesday, 15 October 2019

अष्टपैलू राधिका, म्हणजे 'छोटा पॅकेट, बडा धमाका'!!!

मोठ्या कालावधीनंतर 'झी युवा' वाहिनीवर, कथाबाह्य कार्यक्रमाची पर्वणी अनुभवण्याची संधी, 'युवा सिंगर एक नंबर' या कार्यक्रमातून प्रेक्षकांना मिळाली आहे. अवघ्या काही काळातच हा कार्यक्रम खूप लोकप्रिय झाला आहे. या कार्यक्रमाची निराळी अशी संकल्पना, आगळी रूपरेषा सर्वांना आवडली आहे. या स्पर्धेतील स्पर्धकांसाठी वयाचे कोणतेही बंधन नाही. स्पर्धेच्या लोकप्रियतेत ही बाबदेखील फार महत्त्वाची ठरली आहे. 
संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून प्रतिभावंत गायक या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. नाशिकची राधिका पवार ही या स्पर्धेतील वयाने लहान असणाऱ्या स्पर्धकांपैकी एक आहे. आपल्या उत्तम गाण्याने परिक्षकांवर व प्रेक्षकांवर छाप पाडणारी ही गुणी गायिका म्हणजे 'छोटा पॅकेट बडा धमाका' आहे. गायन स्पर्धेत नाव मिळवले असले, तरी कलेच्या क्षेत्रात ती एक अष्टपैलू आहे. वयाच्या १२व्या वर्षीच, मंचावर वावरण्याची उत्तम जाण तिच्याकडे आहे. परिक्षकांनी तिच्या उत्कृष्ट गाण्याचे अनेकदा कौतुक केलेले आहे. गाण्याची कला दर्जेदारपणे निभावून नेणारी राधिका, एक दमदार अभिनेत्री सुद्धा असल्याचे तिच्या एकपात्री प्रयोगांमधून लक्षात येते. अनेक स्पर्धांमध्ये बक्षीस मिळवत, तिने आपली अभिनयाची आवड सुद्धा जोपासली आहे. याशिवाय शाळेच्या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून, 'रोप मल्लखांब' या खेळात सुद्धा ती निपुण झालेली आहे. एकत्र कुटुंबातील सदस्य असणारी राधिका, घरातही सगळ्यांची लाडकी आहे. एक गुणी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून राधिका आज सगळ्यांच्याच गळ्यातील ताईत झालेली आहे.
इतर स्पर्धकांप्रमाणेच, राधिकालाही स्पर्धा जिंकण्याची इच्छा आहे. आपल्या उत्तम गायनकलेतून इतर स्पर्धकांना दमदार टक्कर देत तिने आपले एक निराळे स्थान निर्माण केलेले आहे. स्पर्धा जिंकण्याचे आपले स्वप्न साकार करण्यासाठी लहानगी राधिका खूप मेहनत घेते आहे. आपले हे स्वप्न पूर्ण करण्याकरिता तिची वाटचाल कशी सुरू आहे, हे जाणून घेण्यासाठी नक्की पाहत रहा, 'युवा सिंगर एक नंबर' फक्त आपल्या लाडक्या 'झी युवा' वाहिनीवर!!! 

No comments:

Post a Comment