Sunday 20 October 2019

Rohit Sharma-CricKingdom Cricket Academy launched

Photo Caption: 
(L-R) CricKingdom4: Parag Dahiwal, Director & Country Head, CricKingdom, Gurunath Sharma, father of Indian cricketer, Rohit Sharma, Yusuf Abrahani  President, Islam Gymkhana, Chetan Suryawanshi, CEO, CricKingdom among young cricketers during the launch of the Rohit Sharma-CricKingdom Cricket Academy at Islam Gymkhana on Friday.
CricKingdom9: Gurunath Sharma, father of Indian cricketer, Rohit Sharma seen batting in the nets during the launch of Rohit Sharma-CricKingdom Cricket Academy at Islam Gymkhana on Friday. 
रोहित शर्मा-क्रिककिंग्डम क्रिकेट अकॅडमीचे मुंबईत अनावरण
मुंबई भारताचा आक्रमक फलंदाज रोहित शर्मा क्रिककिंग्डम सोबत आला असून दोघांनीही मिळून मुंबईमध्ये क्रिकेट अकॅडमी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहेमुंबई क्रिकेटसाठी ही अभिमानाची बाब आहे.रोहित शर्मा-क्रिककिंग्डम क्रिकेट अकॅडमीचे 18 ऑक्टोबरला इस्लाम जिमखाना मुंबई येथे अनावरण करण्यात आले
   रोहित शर्मा आणि क्रिककिंग्डम अकॅडमीच्या माध्यमातून युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासोबतच नावाजलेल्या प्रशिक्षकांसोबत मार्गदर्शन देखील त्यांना मिळणार आहे.प्रशिक्षण घेणाऱ्या मुलांना एका कार्यक्रमाअंतर्गत घेण्यात येणार असून त्यांच्या कामगिरीवर विशेष लक्ष देखील देण्यात येईल
  भारतीय संघासोबत व्यस्त असलेल्या ब्रँड अॅबेसेडर रोहित शर्मा हा सदिच्छा देताना म्हणाला कीक्रिककिंग्डम मुंबईमध्ये क्रिकेट अकॅडमी सुरू करत असून ही आनंदाची गोष्ट आहेया माध्यमातून स्थानिक पातळीवरील क्रिकेटला आम्ही पुढे नेऊयासोबतच आम्ही ट्रेनिंग  ट्रॅकिंग मोबाईल एपच्या माध्यमातून खेळाडूंवर लक्ष ठेवण्यात येईलतसेचक्रिककिंग्डम अकॅडमीच्या माध्यमातून विदेशातही जाण्याची संधी मिळेल.अकॅडमी चालवण्याचा चांगला अनुभव असलेल्या टीम सोबत असल्याने या उपक्रमातून युवा खेळाडूंना फायदा होईल.
  क्रिककिंग्डमचा मेंटर असलेला धवल कुलकर्णी म्हणाला कीक्रिककिंग्डमच्या माध्यमातून फक्त टीअर वन शहरासोबतच भारताच्या टीअर टू  टीअर थ्री शहरातही अशाच पद्धतीचे व्यासपीठ उभारण्याचा आमचा प्रयत्न असेलपालकांना कार्यक्रमाबाबत देखील माहिती देण्यात येणार आहे.
   तब्बल 10 वर्ष सिंगापूर क्रिकेट संघाचे कर्णधार भूषविलेले  क्रिककिंग्डमचे सीईओ चेतन सूर्यवंशी म्हणाले कीक्रिककिंग्डम या व्यासपीठाच्या माध्यमातून क्रिकेटखेळाडूप्रशिक्षक आणि विद्यार्थी सर्व एकाच ठिकाणी येतात.क्रिककिंग्डममुळे अनेक खेळाडूंना त्याला फायदा मिळत आहे.
   सिंगापूर संघाचे प्रतिनिधित्व केलेले तसेच संचालक  कंट्री हेड पराग दहीवाल म्हणाले कीमुलांनी वयाच्या पाचव्या वर्षांपासून क्रिकेट खेळण्यास सुरुवात करावी असे आम्हाला वाटतेजेणेकरून त्यांना शालेयजिल्हास्तरीयराज्यस्तरीय आणि राष्ट्रीय संघाकडून खेळण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन मिळेल.
  अकॅडमीच्या नियमित बॅचेसना 1 नोव्हेंबर 2019 पासून सुरुवात होणार असून सहा वर्षे  पुढील वयोगटातील मुले  मुली यांसाठी अकॅडमी वर्षभर सुरू असणार आहेभारतामध्ये महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी अकॅडमीकडून प्रत्येक आठवड्याला 6 ते 16 वर्षादरम्यानच्या मुलींसाठी मोफत प्रशिक्षण सत्र आयोजित केले जाणार आहे.
 अकॅडमी मार्फत विशेष कॅम्प्सक्लिनिक्सफिटनेसस्ट्रेंथ अँड कंडीशनिंगव्हिडिओ एनालिसिस सत्रवैयक्तिक सराव आणि स्थानिक  आंतरराष्ट्रीय दौरे अशा योजना राबविल्या जातातअकॅडमीच्या विद्यार्थ्यांना रोहित  धवल सोबत मास्टर क्लास सत्रात देखील सहभाग नोंदवता येणार आहे.
क्रिककिंग्डमच्या अकॅडमी चेन्नई  वेल्लूर येथे असून लवकरच पुणेहुबळी आणि सांगली येथे तरभारतासह विदेशात अकॅडमी सुरू करण्याचा विचार आहे.तुम्ही crickingdom.com/registration या संकेतस्थळाला भेट देऊ शकतातसेच अकॅडमीच्या अधिक माहितीसाठी 7738798790 / 7219195459 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

No comments:

Post a Comment