Tuesday, 14 May 2019

मुक्ता बर्वे यांची प्रमुख भूमिका असलेला राष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक संजय कृष्णाजी पाटील लिखित नवा महिलप्रधान चित्रपट ‘बंदिशाळा’ येत्या २१ जून रोजी रसिकांच्या भेटीला!

'जोगवा', 'पांगिरा', '७२ मैल एक प्रवासया गाजलेल्या दर्जेदार चित्रपटांचे लेखक प्रस्तुतकर्ते आणि 'दशक्रियाया चित्रपटाच्या पटकथा लेखनासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवलेले संजय कृष्णाजी पाटील त्यांचा नवा चित्रपट घेऊन येत आहेत.शांताई मोशन पिक्चर्स या संस्थेची पहिली निर्मिती असलेला सौ. स्वाती संजय पाटील निर्मित व संजय कृष्णाजी पाटील आणि श्री माऊली मोशन्स पिक्चर्स प्रस्तुत व मिलिंद लेले दिग्दर्शित बंदिशाळा या सत्य घटनेवर आधारित चित्रपटाची कथाही संजय कृष्णाजी पाटील यांनी लिहिली असून पहिल्यांदाच त्यांनी कादंबरी बाहेरील विषयालाहात घेतला आहे. हा चित्रपट येत्या २१ जून २०१९ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कान्ससाठी निवड झाली असून ५६ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ठ कलादिग्दर्शनाच्या घोषित पुरस्कारासह ६ विभागांमध्ये नामांकने मिळाली आहेत.
बंदिशाळामध्ये मध्यवर्ती भूमिकेत मुक्ता बर्वे यांची अत्यंत धाडसी भूमिका असून तिची ही भूमिका पहाण्यासाठी तिच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. हा चित्रपट मिलिंद लेले यांनी दिग्दर्शित केला आहे. ५६ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये’ सर्वोत्कृष्ठ कलादिग्दर्शन घोषित पुरस्कारासह ६ विभागांमध्ये सर्वोत्कृष्ठ चित्रपट निर्मितीसर्वोत्कृष्ठ चित्रपट निर्माता पदार्पणसर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीसर्वोत्कृष्ठ गीतकारसर्वोत्कृष्ठ गायिकासर्वोत्कृष्ठ पार्श्वसंगीतासह पहिल्या सर्वोत्कृष्ठ दहा चित्रपटामध्ये बाजी मारली आहे.
संजय कृष्णजी पाटील लिखित प्रस्तुत बंदिशाळा हा एक सामाजिक महत्वाकांशी चित्रपट असून त्याला एका कारागृहाची पार्श्वभूमी लाभली आहे. एका कर्तव्यदक्ष महिला तुरुंग अधिकार्‍याची कथा या चित्रपटातून उलगडणार असून ही भूमिका आणि हा वेगळा विषय मुक्ता बर्वे या अभिनेत्रीने उत्तुंग शिखरावर पोहचविला आहे. तिने या चित्रपटात माधवी सावंत ही महिला तुरुंग अधिकारी जीवंत केली आहे. आजपर्यंतची सर्वाधिक आव्हानात्मक भूमिका तिला या निमित्ताने करायला मिळाली आहे.
सौ. स्वाती संजय पाटील यांच्याशांताई मोशन पिक्चर्स निर्मित आणि संजय कृष्णाजी पाटील व श्री माऊली मोशन्स पिक्चर्स प्रस्तुत बंदिशाळाचे सहनिर्माते पायल गणेश कदममंगेश रामचंद्र जगताप असून या चित्रपटाचे कथापटकथासंवादगीते आणि प्रस्तुती अश्या विविधांगी भूमिका संजय कृष्णजी पाटील यांनी पार पडल्या असून दिग्दर्शन मिलिंद लेले यांचे आहे. जेष्ठ सिनेमॅटोग्राफर सुरेश देशमाने यांच्या कॅमेऱ्यातूनबंदिशाळेतील घटनाक्रम पहायला मिळणार असून संजय कृष्णाजी पाटील लिखित चार गीतांना संगीतकार अमितराज यांनी स्वरबद्ध केले आहे. यामध्ये प्रार्थनालावणीथीम सॉंग आणि लग्नगीत असून प्रसिद्ध गायिका वैशाली सामंतप्रियांका बर्वेआरती केळकरआरोही म्हात्रे इत्यादी गायकांच्या आवाजाचा पगडा ही गीते ऐकताना - चित्रपट पाहताना रसिकांवर पडल्यावाचून राहणार नाही. प्रसिद्ध कोरिओग्राफर विठ्ठल पाटील यांनी या चित्रपटातील गाण्यांवरसाजेशी नृत्यरचना केली आहे. बंदिशाळेसाठी तुरुंगाचा भव्य सेट नरेंद्र हळदणकर यांनी उभा केला असून रंगभूषा विजय पाटील यांनी केली आहे. ध्वनिमुद्रण प्रकाश निमकर यांनी केले असून प्रमुख सहाय्यक दिग्दर्शन सुनील मांजरेकर यांचे आहेप्रॉडक्शन कंट्रोलर शंकर धुरी तर फायनान्स कंट्रोलर पी.आर. पालवे यांनी केले आहे. चित्तथरारक साहसदृश्य प्रशांत नाईक यांनी डिझाईन केली असून पार्श्वसंगीत विजय नारायण गवंडे यांनी दिले आहे. बंदिशाळेला वेगवान करण्यासाठी संकलक भक्ती मायाळू यांचे कसब लागले असून इंग्रजीमध्ये उपशीर्षके विशाखा गोखले यांनी लिहिली आहे. कार्यकारी निर्मितीची सूत्रे राम कोंडू कोंडीलकर यांनी सांभाळली आहेत.
बंदिशाळाया चित्रपटात मुक्ता बर्वे यांच्यासोबतच विक्रम गायकवाडशरद पोंक्षेहेमंगी कवीसविता प्रभुणेअशा शेलारप्रवीण तरडेअश्विनी गिरीअजय पुरकर,माधव अभ्यंकरशिवराज वाळवेकरआनंद आलकुंटेअभिजीत झुंजाररावआनंदा कार्येकरप्रसन्न केतकरवर्षा घाटपांडेसोनाली मगरप्रताप कळकेराहुल शिरसाटपंकज चेंबूरकरलक्ष्मीकांत धोंडअनिल राबाडेउमेश बोलकेअनिल नगरकर आणि उमेश जगताप यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरणपुणे शहरपुणे ग्रामीणभोर तालुकामुंबई अश्या ठिकाणी करण्यात आले आहे. ही एक भव्य आणि उत्कंठावर्धक कलाकृती असून येत्या २१ जून २०१९ रोजी आपले मनोरंजन करण्यासाठी जवळच्या चित्रपटगृहात दाखल होणार आहे

No comments:

Post a Comment