Wednesday, 8 May 2019

दादर व्यापारी संघा तर्फे आज दुपारी शहीद कौस्तुभ राणे ह्यांच्या नातेवाईकांच्या कडे रूपये एक लाखाचा धनादेश सुपूर्द करताना

पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद कुटुंबीयांना छोटीशी मदत करता यावी या उद्देशाने दादरमधील व्यापर्‍यां एकत्र येऊन आपआपल्या परीने वर्गणी काढून एक लाख रुपये एकत्र जमवून आज शहीद कौस्तुभ राणे यांच्या मातोश्रिंकडे सुपूर्द केला. 
दादर मधील सर्व व्यापारी संघटनांनी एकत्र येऊन एकमताने मोर्चा काढून 'पुलवामा दहशत हल्ल्याचा' निषेध नोंदवला होता. या मोर्चात सहभागी व्यापारी संघटनांनी शाहिद जवानांच्या कुटुंबियांकरिता मदत म्हणून कमीत कमी १००० रुपये वर्गणी काढण्याचे मान्य करून संस्थांच्या पदाधिकार्‍यान्कडे गोळा आज ती योग्य हातामध्ये दिल्याची भावना महेश पांडुरंग वैद्य, आनंद जगन्नाथ पेडणेकर, दीपक देवरुखकर, 
श्रीराम पाध्ये, सुनील शहा, संतोष भडेकर, भैरव शहा, राजेश छेडा, यांनी दादर व्यापारी संघ,‘उपनगरीय सराफी संघटना’, ‘सुवर्णकार कारागीर संघटना’, ‘मराठी व्यवसायिक उद्योजक व्यापारी मित्र मंडळ’, ‘दादर मेटल मर्चंट असोसिएशन’, ‘दादर हॉटेल संघटना’, ‘दादर धान्य व्यापारी संघटना’, ‘दादर फेरीवाले संघटना’च्या वतीने व्यक्त केले.

No comments:

Post a Comment