Thursday, 15 April 2021

&TV artists say ‘Maza Garva, Maza Maharashtra’ on World Heritage Day

 जागतिक वारसा दिनानिमित्त एण्‍ड टीव्‍हीवरील कलाकार म्‍हणाले 'माझा गर्व, माझा महाराष्‍ट्र'

महाराष्‍ट्र ही ऐतिहासिक मराठा साम्राज्‍याची जन्‍मभूमी आहे आणि भारताच्‍या इतिहासामध्‍ये महाराष्‍ट्राला अद्वितीय स्‍थान आहे. महाराष्‍ट्राचा उत्‍साह विश्‍वव्‍यापी, अग्रणी-विचारसरणी, सहिष्णु व वैविध्‍यपूर्ण आहे. मंदिरे, किल्‍ले, जुनी स्‍मारके व कला असा संपन्‍न वारसा महाराष्‍ट्राला लाभलेला आहे, ज्‍यामधून लोकांचे मन अभिमानाने भरून जाते. जागतिक वारसा दिनानिमित्त एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका 'भाबीजी घर पर है'मध्‍ये अनिता भाभीची भूमिका साकारणारी आपली लाडकी मराठी मुलगी नेहा पेंडसे आणि मालिका 'और भई क्‍या चल रहा है?'मध्‍ये सकिना मिर्झाची भूमिका साकारणारी आकांशा शर्मा महाराष्‍ट्राच्‍या संपन्‍न वारशाबाबत सांगत आहेत. आकांशा शर्मा ऊर्फ सकिना मिर्झा म्‍हणाली, ''महाराष्‍ट्र संपन्‍न, वैविध्‍यपूर्ण व उत्‍साहवर्धक संस्‍कृतीने नटलेला आहे आणि ही संस्‍कृती भव्‍य नयनरम्‍य स्‍थळांमधून दिसून येते. राज्‍यामध्‍ये या वैविध्‍यपूर्ण व आकर्षक स्‍थळांची संपन्‍न झलक पाहायला मिळते. औरंगाबादजवळ असलेल्‍या प्रसिद्ध अजंठा एलोरा लेण्‍या आकर्षक व सौंदर्याच्‍या परिपूर्ण उदाहरण आहेत. या लेण्‍यांमध्‍ये सर्वोत्तम भारतीय वास्‍तुकला, तसेच शिल्‍पकला पाहायला मिळते. खडकांवरील या आकर्षक कलाकृती आजही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.'' मुंबईची मुलगी नेहा पेंडसे ऊर्फ अनिता भाभी म्‍हणाली, ''मी संपन्‍न वारसा असलेल्‍या या सांस्‍कृतिकदृष्‍ट्या वैविध्‍यपूर्ण राज्‍यामध्‍ये राहत असल्‍यामुळे स्‍वत:ला धन्‍य मानते. महाराष्‍ट्राच्‍या इतिहासामध्‍ये किल्‍ल्‍यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, ज्‍यामध्‍ये सह्यादी पर्वतरांगा खूपच प्रसिद्ध आहेत. या पर्वतरांगा दक्षिण भागातील आपले उमदा राजे महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या कथेला प्रतिबिंबित करतात. फक्‍त एवढेच नाही, पुण्‍यामधील वाडा शहराची संपन्‍न संस्‍कृती आणि राज्‍याच्‍या वारसाचे प्रतीक आहे. मी 'आमची मुंबई'मध्‍ये जन्‍मले आणि मोठी झाले. येथे चित्रपटसृष्‍टी देखील महत्त्वाची भूमिका बजावते. दरवर्षी हजारो महत्त्वाकांक्षी लोक शहरामध्‍ये मोठी कामगिरी करण्‍याच्‍या आशेसह येतात. संस्‍कृती, उत्‍साह व गतीशीलतेचे खरे स्‍थान असण्‍याव्‍यतिरिक्‍त मुंबईचा संपन्‍न इतिहास व वारसा देखील आहे. प्रत्‍येक मुंबईकराला रस्‍त्‍यावरील स्‍थानिक खाद्यपदार्थ खूप आवडतात आणि गणेश चतुर्थी, दिवाळी, नाताळ व ईद यांसारखे सण उत्‍साहाने साजरे केले जातात. यंदा जागतिक वारसा दिनानिमित्त मी सर्वांना आपली बहुमूल्‍य व ऐतिहासिक स्‍मारकांचे जतन करण्‍याचे आणि वेळात वेळ काढून प्रत्‍येक स्‍मारकामागील महत्त्व जाणून घेण्‍याचे आवाहन करते.''

पहा 'और भई क्‍या चल राहा है?' रात्री ९.३० वाजता आणि 'भाबीजी घर पर है' रात्री १०.३० वाजता फक्‍त एण्‍ड टीव्‍हीवर

No comments:

Post a Comment