Friday 30 April 2021

महाराष्ट्र दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण यांचे कृष्णाकाठ स्टोरीटेलवर


कृष्णाकाठची गाथा ऐका सचिन खेडेकरांच्या भारदस्त आवाजात.


 

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र कृष्णाकाठ आणि त्यांनी विविध प्रसंगांच्या निमित्ताने दिलेल्या भाषणांचा संग्रह असणारे भूमिका हे पुस्तक स्टोरीटेलवर एकाचवेळी प्रकाशित होत आहे. एक मे रोजी साज-या केल्या जाणा-या ६०व्या महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ही दोन्ही ऑडिओबुक्स रोहन प्रकाशनाच्या सहकार्याने रसिकांसाठी 'स्टोरीटेल'वर सादर केली जाणार आहेत. सुप्रसिध्द अभिनेते सचिन खेडेकर यांनी या दोन्ही पुस्तकांचे अभिवाचन केले आहे.

यशवंतराव चव्हाण यांचे 'कृष्णाकाठहे आत्मचरित्र मराठी साहित्यातील एक महत्वाचा ठेवा मानला जातो. सातारा जिल्ह्यातील एका छाेट्याशा गावातून कार्यकर्ता म्हणून आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात करून महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून मंगलकलश आणण्याचा मान मिळवणारे आणि भारताचे उपपंतप्रधानपदी पोहचणारे यशवंतराव चव्हाण यांची राज्यातील आणि केंद्रातील कारकीर्द अतिशय प्रेरणादायी आहे. त्यांच्या आत्मचरित्रातुन महाराष्ट्रातील सामाजिकराजकीय आणि स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास समजतो. तसेच ग्रामीण भागातील तरूणांना सामाजिक व राजकीय कार्याची प्रेरणाही मिळते.

'भूमिकाया पुस्तकात यशवंतराव चव्हाण यांनी विविध ठिकाणी दिलेल्या भाषणांचा संग्रह आहे. ही भाषणे ऐकताना महाराष्ट्राच्या विकासाबद्दलचे यशवंतराव यांचे चिंतन आणि विचार किती दूरगामी होते याचे दर्शन घडते. महाराष्ट्रातील शैक्षणिकराजकीय आणि सामाजिक विकासावर यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा मोठा पगडा आहे. त्यामुळे आजही महाराष्ट्रातील प्रश्नांबद्दल भूमिका घेताना हे पुस्तक मार्गदर्शनपर ठरते.

'स्टोरीटेल'च्या निमित्ताने मराठीतच नव्हे तर सर्व भारतीय भाषांमध्ये ऑडिओबुक्सची निर्मिती केली जात आहे आणि त्याला साहित्यप्रेमी वाचक श्रोत्या रसिकांचा अमाप प्रतिसाद मिळू लागला आहे. गुगलप्ले स्टोअर किंवा पस्टोअरवर जाऊन 'स्टोरीटेलहे प सहज डाऊनलोड करता येते किंवा www.storytel.com या वेबसाईटवर जाऊन हे प डाऊनलोड करणे खूपच सोपे आहे.

फक्त दरमहा रू. २९९/- मध्ये मराठीइंग्रजीसह सर्व भारतीय भाषांतील ऑडिओबुक्स किंवा दरमहा फक्त रू.११९/- मध्ये फक्त मराठी पुस्तके 'सिलेक्ट मराठीयोजनेत मिळतात. ऑडिओबुक्स कुठेहीकितीही व कधीही ऐकता येतात. 'स्टोरीटेलडाऊनलोड करून आणि 'यशवंतराव चव्हाणयांची ऑडिओबुक्स ऐकण्यास सुरूवात करून खऱ्या अर्थाने 'महाराष्ट्र दिनसाजरा करता येईल.

No comments:

Post a Comment