Thursday, 29 April 2021

&TV | समाज व कौटुंबिक समस्‍यांमध्‍ये अडकले भीमराव

एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका 'एक महानायक डॉ. बी. आर. आम्‍बेडकर'च्‍या आगामी एपिसोडमध्‍ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे की भीमरावांचे जीवन एका विलक्षण टप्‍प्‍यावर आहे, जेथे त्‍यांना चोहोबाजूंनी त्रास दिला जात आहे. सर्वज्ञ महाराज याच्‍या मास्‍टर प्‍लानमुळे भीमच्‍या समुदायांमध्‍ये दुफळी निर्माण होते. शेवटी, ही दरी भीमराव व बाला यांच्‍यामध्‍ये वाढत जाते. बाला आपल्‍या बाजूने नसल्‍यामुळे त्‍यांना खूप दु:ख होते. तसेच त्‍यांच्या बुआला विधवा महिलेच्‍या रूढी पालन करण्‍यास भाग पाडल्‍याचे पाहून त्‍यांच्‍यासमोर मोठे आव्‍हान उभे राहते, ज्‍यामुळे ते असहाय्य होतात. यामधून क्रांतीचा उगम होतो, जेथे स्थितीला वाईट वळण मिळते. परिस्थिती हाताबाहेर जात असताना भीमराव कशाप्रकारे या स्थितीचा सामना करतील? विद्यमान एपिसोडबाबत सांगताना रामजी सकपाळची भूमिका साकारणारे जगन्‍नाथ निवंगुणे म्‍हणाले, ''भीमराव सर्वात अनपेक्षित स्थितीमध्‍ये अडकल्‍यानंतर असुरक्षित व चिंताग्रस्‍त दिसेल. आपल्‍या अवतीभोवती असलेल्‍या समस्‍यांसाठी उपाय शोधण्‍यामध्‍ये असमर्थ ठरल्‍यामुळे तो निराश होतो. भीमला त्‍याचा समाज व त्‍याच्‍या कुटुंबापासून दूर करण्‍यामध्‍ये यावेळी महाराज यशस्‍वी होईल का? अधिक जाणण्‍यासाठी पाहा 'एक महानायक डॉ. बी. आर. आम्‍बेडकर' दर सोमवार ते शुक्रवार रात्री ८.३० वाजता फक्‍त एण्‍ड टीव्‍हीवर.''

No comments:

Post a Comment