English :
Navratri Special : Fakt Marathi ' Anadi Nirgun' Movie Festival
- Apart from the film festival, the channel also has plans for other interesting initiatives up its sleeves
23rd September, 2019 : Navratri festival is of nine days dedicated to Goddess Shakti and her nine incarnations. Fakt Marathi is celebrating Navratri by playing nine devotional movies of Goddesses under a movie festival titled ‘ Anadi Nirgun’. The movie festival which is commencing from 29th September will end on 7th September. All these nine Devi movies shall be broadcasted at 08:30 timeband.
'Ude Ga Ambe Ude' Movie Festival consists of Aai Tulja Bhawani (29/09/2019), Kalubai Pavali Navasala(30/09/2019), Jai Mohata Devi(01/10/2019), May Mauli Manudevi (02/10/2019), Mahima Annapurna Devicha (03/10/2019), Aai Ekvirecha Udo Udo (04/10/2019), Jogwa Ambabaicha(05/10/2019), Kulaswamini Tuljabhawani (06/10/2019) and Ma Shakambharicha Mahima (07/10/2019). All of these movies has significant stars from Marathi industry. Also each film has a strong message underlined depicting the prowess of each goddess and women power.
'Pride of language...Heritage of culture' is the tagline of Fakt Marathi. Accordingly, it is catering across all segments of the society, dedicated to all entertainment needs of viewers with best programs and movies. Now the channel has broadened it's horizons with the start of fresh and original content programming through 'Dhoomdhadaka' and 'Sindhu'. 'Another couple of projects are in the pipeline and there's an interesting programming roadmap ahead' states Shyam Malekar, the Business Head of Fakt Marathi.
Marathi :
नवरात्री स्पेशल : फक्त मराठी 'अनादी निर्गुण' सिनेमहोत्सव or
अनादी निर्गुण: देवीच्या विविध रूपांची अनुभूती देणाऱ्या चित्रपटांची मेजवानी!
२३ सप्टेंबर, मुंबई : प्रेक्षकांना अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून विजयादशमीपर्यंत देवीच्या विविधरूपांचे अनुभूती देणारे चित्रपट आठवडाभर पाहण्याची संधी मिळणार आहे. 'फक्त मराठी' वाहिनीवर २९ सप्टेंबरपासून ७ ऑक्टोबरपर्यंत रोज सकाळी ८.३० वाजता हे चित्रपट 'अनादी निर्गुण' सिनेमहोत्सवाअंतर्गत पाहता येणार आहेत.
'अनादी निर्गुण' सिनेमहोत्सवामध्ये आई तुळजा भवानी (२९ सप्टेंबर), काळूबाई पावली नवसाला (३० सप्टेंबर), जय मोहता देवी (१ ऑक्टोबर), माय माऊली मनुदेवी (२ ऑक्टोबर), महिमा अन्नपूर्णा देवीचा (३ ऑक्टोबर), आई एकवीरेचा उदो उदो (४ ऑक्टोबर), जोगवा अंबाबाईचा (५ ऑक्टोबर), कुलस्वामिनी तुळजाभवानी (६ ऑक्टोबर) आणि माँ शाकंभरीचा महिमा (७ ऑक्टोबर) या चित्रपटांचा समावेश असणार आहे.
'अभिमान भाषेचा...वारसा कलेचा' असे 'फक्त मराठी'चे ब्रीदवाक्य आहे. या वाहिनीने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान घट्ट केले आहे. ही वाहिनी आता कात टाकत असून मालिकांच्या नवनिर्मितीकडे वळाली आहे. अलीकडेच फक्त मराठीवर 'सिंधू' आणि 'धूमधडाका' हे दोन नवे शोज लाँच करण्यात आले. वाहिनीचे बिझनेस हेड श्याम मळेकर सांगतात, 'नवरात्रीच्या नऊ दिवसांसाठी आम्ही अनादी निर्गुणनिमित्त प्रेक्षकांसाठी सकाळच्या वेळेत देवीच्या लोकप्रिय चित्रपटांचे दालन घेऊन आलो आहोत. येत्या काळात सिनेमा आणि मालिकांसंबंधी आणखीनही काही नवीन प्रयोग वाहिनीवर बघायला मिळतील.'
No comments:
Post a Comment